शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मेट्रोचे कारशेड आता राई-मुर्धा गावात नव्हे तर डोंगरी येथील सरकारी जागेत होणार

By धीरज परब | Updated: July 24, 2023 21:08 IST

ताबा एमएमआरडीए कडे देण्याचे पत्र शासनाने ठाणे जिल्हाधिकारी याना दिले आहे . 

मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो साठी राई - मुर्धा दरम्यानची खाजगी जागा आरक्षित केल्यावरून स्थानिकांच्या संघटनेने केलेल्या विरोधाला आमदार प्रताप सरनाईक यांचे पाठबळ मिळाल्या नंतर आता मेट्रो कारशेड हे डोंगरी येथील सरकारी जागेत होणार असून त्याजागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीए कडे देण्याचे पत्र शासनाने ठाणे जिल्हाधिकारी याना दिले आहे . 

मीरा भाईंदर साठीच्या मेट्रो ९ तसेच मेट्रो ७ अ मार्गाच्या कारशेड साठी गेल्यावर्षी मोरवा, राई व मुर्धा दरम्यानच्या ३२ हेक्टर मोकळ्या खाजगी जमिनीवर शासनाच्या नगरविकास विभागाने आरक्षण टाकले होते . मेट्रो कारशेडला स्थानिकांच्या संघटने मार्फत विरोध करण्यात आला होता . ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडे गाऱ्हाणे  मांडल्या नंतर , राई , मुर्धा , मोरवा हि गावे स्थानिक आगरी भूमिपुत्रांची असून शासनाने उत्तन भागातील सरकारी जागेवर कारशेड उभारावी अशी मागणी लावून धरली होती . त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह एमएमआरडीए व संबंधित विभागां कडे पाठपुरावा चालवला होता . 

त्या नंतर डोंगरी येथील सरकारी जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते . सर्वे क्रमांक १९ ची पाहणी एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांनी देखील केली होती . एमएमआरडीए ने सदर जमीन मेट्रो कारशेड साठी मिळण्या करता शासना कडे पत्र व्यवहार सुरु केला . शासनाच्या महसूल विभागाचे कक्ष अधिकारी भास्कर पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना पत्र पाठवून डोंगरी येथील सरकारी जमीनीचा विनामोबदला आगाऊ ताबा देण्यास कळवले आहे . 

मेट्रो कारशेड आपल्या गावात होणार नाही अशी खात्री होताच लढा उभारणाऱ्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार प्रताप सरनाईक सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शासनाचे आभार मानले आहेत . तर येत्या महिन्यात सदर जमिनीचा ताबा एमएमआरडीए कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण होवून येथे मेट्रो कारशेड साठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे . कारशेड मुर्धा , राई व मोरवा गावातून हटल्याने स्थानिक भूमिपुत्रांना शासनाने न्याय दिल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडMetroमेट्रो