शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा : आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:14 IST

निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या  मतांनी पराभूत झाले.

ठाणे : राज्यात एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा. सगळीकडे वातावरण खराब करण्याचे काम भाजपच करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार)चे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला.     ठाणे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) च्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आ. आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी त्यांनी  निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता. ज्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते, पण आज तेच सुधीर भगत निवडून आले आहेत. 

निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या  मतांनी पराभूत झाले. काहींचे मताधिक्य कमी झाले, अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही अधिक असती, असा दावा त्यांनी केला.  

ठाणे पालिकेत वेगळा विचार करण्याची भाषा भाजप करत आहे. मग मागील दहा दिवस त्यांच्याबरोबर  एकत्र का होतात, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.भाजपची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.   

English
हिंदी सारांश
Web Title : BJP should introspect on MIM's rise: Jitendra Awhad

Web Summary : NCP's Jitendra Awhad accuses BJP of creating a खराब atmosphere, leading to MIM's growth. He criticized the election commission's irregularities and BJP's contradictory stance in Thane Municipal Corporation, alleging voter deception.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन