शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी करिष्मासह बिपाशाचा ठाणेकर युवा मतदाराना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:22 IST

अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले.

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यात सध्या ५९ लाख २७ हजार सात मतदारजिल्ह्यातील दोन हजार १८६ सैनिकांनी मतदारनोंदणीमतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतातराज्यात सर्वाधिक ३३० तृतीयपंथींची (थर्ड जेंडर) मतदार म्हणून ठाणे जिल्ह्यात नोंदणी

ठाणे :राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर व बिपाशा बसू यांनी ‘मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. तो आपला हक्क आहे’ असे येथील उपस्थित महाविद्यालयीन युवायुवतींकडून वदवून घेऊन मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमाद्वारे केले.दोन दिवसांपासून ज्यांची उत्सुकता होती, त्या अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले. या कार्यक्र मास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव आदींची उपस्थिती होती.राज्यात सर्वाधिक ३३० तृतीयपंथींची (थर्ड जेंडर) मतदार म्हणून ठाणे जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरात दोन लाख ११ हजार नवीन मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आल्याची माहिती गुरुवारी पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथही त्यांनी उपस्थितांना दिली.ठाणे जिल्ह्यात ५९.२७ लाख मतदारठाणे जिल्ह्यात सध्या ५९ लाख २७ हजार सात मतदार आहेत. सेनादलातील मतदारांची नोंदणी आता आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दोन हजार १८६ सैनिकांनी मतदारनोंदणी केली आहे. यावर्षी प्रथमच एफड ठएळ पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीमध्ये मतदारनोंदणी करताना मतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतात. अशी प्रणाली वापरणारा महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे. या पद्धतीत ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६९६ मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनीही मतदानाचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचा दृकश्राव्य संदेशदेखील दाखवण्यात आला. याप्रसंगी सहस्रक मतदार, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय निवडणूकविषयक सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्या मुलांचाही गौरव करण्यात आला. सैन्यदलातील नव्याने मतदार म्हणून नोंदणी झालेल्या मुकेश कांबळे, आर.सी. शर्मा, जयंत गोगटे, जगन्नाथ सिन्नरकर, शिवालीनाथ थोरात यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनगाणी या प्रसाद महाडकर यांच्या वाद्यवृंदाने आणि गायिका सोनाली कर्णिक, मंदार आपटे यांच्या गीतांनी सभागृहात ठेका धरायला लावला. योगेश भिडे यांच्या मतदारांसाठी असलेल्या पथनाट्यानेही वाहवा मिळवली.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार