शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

By अजित मांडके | Updated: September 27, 2022 12:57 IST

थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली.

ठाणे : बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चंपासिंग थापा यांनी सोमवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर, थापा यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा माणूस अशी टीका करत पैसे घेत त्यांनी प्रवेश केल्याचा आरोप केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना, थापा हा पैशाने विकणारा माणूस नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तसेच थापांवरील आरोप हा त्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने तो नेपाळी समाज आणि नेपाळी माणसाचा अपमान असे म्हणून त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.        थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. तसेच त्याने पैसे घेऊन प्रवेश केला असा आरोपही केला गेला. त्या आरोपाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उत्तर देताना ते कोणाला नोकर समजले त्याच्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली आहे. तसेच थापा हे मध्यंतरी आपणास येऊन भेटले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नाराजी ही व्यक्त केली होती. तर हा माणूस पैशाने विकणारा नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तो बाळासाहेबांसोबत अनेक वर्ष होता. बाळासाहेब आणि थापा हे समीकरण अख्खा देशाने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हा खऱ्या अर्थाने नेपाळी माणूस आणि समाजाचा अपमान आहे. त्याचा आपण जाहीर निषेध करतो असे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.

लवकरच २० हजारांची पोलीस भरती

नुकताच कॅबिनेटमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. २० हजार जणांच्या भरतीत मोठया प्रमाणात महिला पोलीस दलात येतील, आणि त्या राज्याचा कायदा व सुव्यवस्था सांभाळतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे