शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नागरिकांनी दिवाळीमध्ये पाळली आवाजाची मर्यादा; मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 00:24 IST

दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे मात्र ध्वनिप्रदूषणाने गाठली ११० डेसिबलची पातळी :

ठाणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात ध्वनिप्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला. मागील वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची पातळी १२५ पेक्षाही कमी झाल्याचे पाहणीत आढळले होते. यंदा मात्र त्यात आणखी फरक पडल्याचे दिसले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची पातळी ८५ डेसिबलपर्यंतच असल्याचे पाहणीत दिसले. वाढत्या जनजागृतीमुळे मोठ्या आवाजांच्या फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन आतषबाजीच्या फटाक्यांची मागणी मात्र वाढल्याचे दिसून आले.

मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर हे ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. ठाणे महापालिका, पोलीस व इतर सामाजिक संस्थांनीही दिवाळीत ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती केल्याने तीन ते चार वर्षांपासून मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शहरात ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण हे १२५ डेसिबल पेक्षा कमी होते. यंदा मात्र या दिवशी ते काहीअंशी वाढले असले तरी आवाजाचे प्रमाण हे ८५ डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती बेडेकर यांनी दिली. या दिवशी शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आदी भागातदेखील फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचे आढळले आहे. पहिल्या दिवशी तर ते फारच कमी होते. तिसऱ्या दिवशी मात्र तेफारच तुरळक दिसल. केवळ लक्ष्मी पुजनाच्याच दिवशीच शहरात अधिक फटाके फोडले गेले.

मागील काही वर्षांत केलेली जनजागृती आणि शाळांनीदेखील विद्यार्थ्यांना केलेले प्रबोधन यामुळे यंदा त्याचा फायदा झाला असून शहरातील उच्चभ्रूवस्ती सोडल्यास इतर ठिकाणी मात्र ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आढळले आहे. मुलांनीदेखील आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी फटाके वाजविण्यावर भर दिला आहे.दरम्यान, २८ आॅक्टोबरला सांयकाळी या भागात ध्वनीची पातळी ही ८५ डेसिबल पर्यंत होती. परंतु, यावेळी फटाक्यांच्या आवाजापेक्षा या भागात झालेल्या वाहतूककोंडी, हॉर्न आणि गाड्यांच्या आवाजामुळे ही मर्यादा तेवढी आढळल्याचे बेडेकर यांनी स्पष्ट केले. एकूणच आणखी जनजागृती झाली व आपण यातून काही बोध घेतला तर मात्र येत्या काळात ध्वनिप्रदूषणाचे हे प्रमाण आणखी कमी होईल, असे ते म्हणाले.तलावपाळी, राम मारुती रोड येथे डिजे साउंडमुळे आवाज मोठादिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.३० वाजता राम मारुती रोड येथे आवाजाची मर्यादा ५५ ते ६० डेसिबल होती. तर तलावपाळी येथे सकाळी ६ वाजता ही मर्यादा ६५ ते ७५ डेसिबल होती. तर पाचपाखाडी भागात ६.३० वजाता ही मर्यादा ७० डेसिबल पर्यंत होते. तर सकाळी ८.३० वाजता तलावपाळी आणि राम मारुती रोड येथे दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमुळे डीजे साउंडमुळे आवाजाची मर्यादा १०० ते ११० पर्यंत गेली होती. सकाळी ९.३० वाजताही हीच परिस्थिती होती. तर याच दिवशी सांयकाळी ७.३० ते रात्री १०.३० पर्यंत तलावपाळी, पाचपाखाडी, राम मारुती रोड, हिरानंदानी मेडोज या भागात ध्वनीची पातळी८० ते ८५ डेसिबलपर्यंत होती.