शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांचे कान शाबूत पण श्वास कोंडला, ध्वनिप्रदूषण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:50 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. गतवर्षी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची मात्र १२५ डेसीबल एवढी होती तर यंदा ती ९५ डेसीबलच्या आसपास नोंदली गेली. एकीकडे ध्वनिप्रदूषण काही अंशी कमी झाले असले तरी वायुप्रदूषणाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.ठाणे महापालिका प्रशासन, पोलीस आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव तथा नवरात्रोउत्सवादरम्यान करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम अखेर दिवाळीत दिसून आला आहे. त्यामुळेच यंदा आवाजांच्या फटाक्यांची मागणी कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची मात्रा १२५ डेसीबल होती. ती यंदा ९५ डेसीबलपर्यंत खाली आली आहे. यामुळे फारसा फरक पडला नसला तरी ठाणेकर नागरिक जागरुक होत असल्याचे दिसत आहे. शहरातील नौपाडा, गोखले रोड, राममारुती रोड आदी परिसरात फटाके फोडण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. त्याचवेळी पाचपाखाडी, वर्तकनगर आणि शहरातील काही भागांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे.ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रदूषण नियंत्रण कक्षाने दिलेल्या अहवालानुसारच मागील चार दिवसांत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता कमी आढळून आली आहे. मागील चार दिवसांच्या डेसीबल्सवर नजर टाकल्यास काही भागात हे प्रमाण २५ डेसीबल्सपर्यंत कमी आले आहे. याचे मुख्य कारण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण हे तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाले असल्याचा दावा आहे. ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी होत असतांना वायुप्रदूषणाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांनी सांगितले की, यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण जरी कमी झाले असली तरी हवेत असलेल्या थंडाव्यामुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. थंड हवामानात फटाक्यांचा धूर अधिक दाटून राहतो आणि तो हवेत चिकटून राहतो. त्यामुळेच वायुप्रदूषण वाढले आहे.>वायुप्रदूषणात वाढदिवाळीपूर्वी १६ आॅक्टोबर रोजी प्रदूषण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्व्हेत हवेत सल्फरडाय आॅक्साइडची मात्र ही २५ अंश होती तर नायट्रोजनडाय आॅक्साइडची मात्रा ३८ अंश होती. दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषण वाढल्याने सल्फरडाय आॅक्साइडची मात्रा ३८ अंशापर्यंत वाढली, तर नायट्रोजनडाय आॅक्साइडची मात्रा ५९ अंशापर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :pollutionप्रदूषण