शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाणेकरांना मालमत्ताकरात सवलत मिळणे कठीण, राष्ट्रवादी होणार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:26 IST

महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती.

ठाणे : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. परंतु, ठाण्यात मात्र शिवसेना नेत्यांच्या उदासीनतेमुळे महासभेत अद्यापही यासंदर्भातील प्रस्ताव येऊ शकला नाही. त्यामुळे ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत मिळावी, यासाठी आता राष्ट्रवादी आक्रमक होणार आहे. शिवसेनेवर त्यासाठी दबाव आणण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.काही महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई आणि ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत दिली जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर, मुंबईत आता त्यादृष्टीने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. परंतु, ठाण्यात अद्यापही त्यादृष्टीने विचार झालेला दिसत नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या नेते मंडळींना छेडले असता आम्ही दिलेले वचन पूर्ण करू, असा दावा आजही केला जात आहे. परंतु, सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये उडत असलेल्या खटक्यांमुळे शिवसेनेने ठाण्यासाठी अशा संदर्भातील प्रस्ताव मंजूर जरी केला, तरी तो अंतिम मंजुरीसाठी शासनाच्या दप्तरी दाखल होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत शासन याला कितपत प्रतिसाद देते, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शिवसेनेच्या दाव्यानुसार त्याला पालिका प्रशासन प्रतिसाद देईल, असे वाटत होते. परंतु, तसे काही घडलेच नाही. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातदेखील याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे ठाणेकरांना मालमत्ताकरात सवलत केव्हा मिळणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे. दुसरीकडे राष्टÑवादी मात्र याबाबत आक्रमक झाली असून वेळ पडल्यास यासंदर्भात शिवसेनेवर दबाव आणला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. यापूर्वीदेखील राष्टÑवादीने यासंदर्भात महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना आणली असता सत्ताधारी शिवसेनेने त्यावर चर्चा करणे टाळले होते. शिवसेना केवळ ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका