शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना दुबिर्णीतून आकाश पाहण्याची मिळणार संधी, ठाण्यात आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:41 IST

ठाणेकरांसाठी अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म येत्या शनिवारी आयोजित केला आहे.

ठळक मुद्दे ठाणेकरांना दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मिळणार संधी,अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने आकाश दर्शन उमेश घुडे, अमोल कुलकर्णी व अमित पाटणकर हे मार्गदर्शन करणार

ठाणे : लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार २८ एप्रिल रोजी सायं. ७.३० वा. गोदुताई ताई परु ळेकर उद्यान, चांदीवाला कॉम्प्लेक्स समोर, चंदन वाडी, ठाणे (प) येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती आयोजक राजेश मोरे यांनी दिली.अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म होत आहे. लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी जागृती व्हावी, ज्योतिषशास्त्रापेक्षा विज्ञानावर विश्वास असावा, अंधश्रद्धेपासून दूर जाऊन दुबिर्णीतून दिसणाऱ्या गोष्टी खºया असतात हे त्यांना पटवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला असल्याचे क्लबचे संस्थापक सदस्य उमेश घुडे याने सांगितले. या कार्यक्र मात ाुरु ,चंद्र हे ग्रह दुर्बिणीतून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे तसेच सूर्यमाले बद्दल माहितीपट दाखवण्यात येणार आहे, अंतराळाबदल माहिती देण्यात येणार आहे. उपस्थितांना प्रोजेक्टरवर व्याख्यान दिले जाणार आहे. सुर्यमालेतील ग्रह आणि त्या आठ ग्रहांबद्दल माहिती दिली जाणार आहे. सुर्यमालेव्यतिरिक्त आपल्या अवकाशात असलेले तारका समुह, दिर्घीका, सुर्याव्यतिरिक्त असलेले मोठे तारे, विश्वाची निमिर्ती कशी जाली, विश्व किती मोठे आहे याची इत्यंभूत माहिती या उपक्रमात दिली जाणार आहे असे उमेशने सांगितले. पाठ्यपुस्तकात शिकत असलेले विज्ञान हे प्रत्यक्षात देखील शिकले जावे असे उमेशचे म्हणणे आहे. यात क्लबचे सदस्य उमेश घुडे, सलील घारपुरे , अमोल कुलकर्णी व अमित पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहे. गेल्या चार वर्षांपुर्वी या क्लबची स्थापना झाली. तेव्हापासून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. पहिल्यांदा ठाण्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात दुबिर्णीतून चंद्र व गुरू दाखविले जाणार आहे. या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : राजेश मोरे जनसंपर्क कार्यालय ए-१/००२, दांडेकर दत्त छाया सोसायटी, संत ज्ञानेश्वर मार्ग, पांचपाखाडी, ठाणे (प).

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईeducationशैक्षणिक