शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

पावसात अडकलेल्या प्रवाशांना ठाणेकरांनी पुढे केले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:07 IST

ठाणे स्टेशन व शहराच्या आसपास परिसरात अडकलेल्या प्रवाशांसाठी तसेच, घरात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांसाठी ठाणेकर मदतीसाठी धावले.

ठाणे : ठाणे स्टेशन व शहराच्या आसपास परिसरात अडकलेल्या प्रवाशांसाठी तसेच, घरात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांसाठी ठाणेकर मदतीसाठी धावले. यावेळी पुन्हा एकदा ठाणेकरांनी माणुसकीचे दर्शन घडविले.नेटकºयांनीही सोशल मीडियावरुन प्रवाशांसाठी आवाहन केले. ंसपर्कासाठी आपापले मोबाईल नंबर देऊन मदतीचा हात पुढे केला. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखा मीडिया मदतीसाठी धावला. दुचाकीवरुन घरी येणाºया तरुणांनी अनेक प्रवाशांना लिफ्टदेखील दिली.मुसळधार पावसात सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली, रस्ते ठप्प झाले. चालत चालत अनेकांनी ठाणे शहर गाठले. प्रवासी अडकल्याची बातमी समजताच विविध संस्था, वैयक्तीक, पक्षाच्यावतीने आपापल्यास्तरावर मदत करीत होते. यात जेवणाची, निवासाची सोय प्रामुख्याने करण्यात आली.केवळ प्रवासी नव्हे तर ठाण्यात राहणाºया रहिवाशांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले अशांनाही भोजन आणि निवारा देण्यात आला. काहींनी आपल्या सहकाºयांना घरी आसरा दिला. यात मुख्य भूमिका बजावली, ती सोशल मीडियाने. नेटकºयांनी येईल तसे मेसेज वेळ न दवडता फॉरर्वर्ड केले. अनेकांनी फेसबुकवर आपले मोबाईल क्रमांक टाकून मदत हवी असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.अमोल फडके यांनी मुंबई ठाण्यातील कोणत्याही भागात पावसामुळे कोणी अडकले असल्यास आणि काही हवे असल्यास कळवा असा मेसेज पोस्ट केला होता तर मुलुंड, नाहुर, भांडुप या परिसरात अडकलेल्यांनी कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क करण्याचे तसेच, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत घरी येऊन आराम करण्याचे आवाहन ओनील कुलकर्णी याने केले होते. ठाणे परिसरात अडकलेले माझ्या घरी येऊ शकता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचा मेसेज हर्षद समर्थ याने मोबाईल क्रमांकासह पोस्ट केला होता... असे अनेक नेटकरी मेसेजेस पोस्ट करत होते आणि मदतीचा हात देत होते.देणाºयांचेहात हजारपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये निवासाची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली. टेंभीनाका, किसननगर, सावरकरनगर, तसेच कोपरी येथील राऊत शाळा या महापालिकेच्या शाळांमध्ये डाळ-खिचडीची तसेच रात्रीच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. नौपाड्यातील चिखलवाडी, मुन्नरशेठ चाळ, मौर्य चाळ व पम्पिंग हाऊस येथे घराघरात पाणी शिरले. त्वरितच महापालिका प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरिक्षत बाहेर काढण्यात आले. यावेळी भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी व नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यावतीने परिसरातील रहिवाशांची गुरु द्वारा व रोटरीच्या आॅफिसमध्ये राहाण्याची व भोजनाची व्यवस्था केली. तीनहातनाका, मुलुंड चेकनाका या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी टीप टॉप प्लाझाच्यावतीने चहा-पाणी, नाश्ता, तसेच, प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली होती आणि हा मेसेज सर्वांना पाठविण्याचे आवाहन टीपटॉप प्लाझाचे मालक रोहीत भाई शहा यांनी केले. आसरा सामाजिक संस्था, वि केयर वेल्फेअर अससोसिएशन व नवतरु ण मित्र मंडळ यांच्यावतीने ठाणे स्थानकावर अडकलेल्या जनतेसाठी राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली. रेल्वे हॉल मध्ये स्त्री - पुरु ष वेगवेळी व्यवस्था ठाणे रेल्वे इन्स्टिटयÞूट हॉलचे व्यवस्थापक राहुल वाघमारे यांच्या साहाय्याने करण्यात आली. संगम डोंगरे, ज्ञानेश शिंदे, नितिन भोई आपल्या सहकाºयांसह तेथील लोकांना खिचडी व पाणीवाटप करीत होते. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना ठाणे शहराच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना कांदे पोहे, बिस्कीट व पाण्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समिक्षा मार्कंडे, सुनंदा जाधव, उज्ज्वला शिंदे, सपना रोहिरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे पश्चिमेकडील चेंदणी कोळीवाड्यात राहणाºया तन्मय कोळी आणि त्याच्या कुटुंबियाच्यावतीने या परिसरातून जाणाºया प्रवाशांसाठी गरमागरम चहा, बिस्कीट तसेच, ज्येष्ठ नागरिक व लहानमुलांना मदत करण्यात आली. लांब राहणाºया प्रवाशांसाठी निवास व्यवस्थादेखील करण्यात आली.ठाणे सिटीझन फाऊंडेशनचे कॅसबर आॅगस्टीन यांनी ठाणे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशांसाठी सेंट जॉन द बाप्टीस स्कूल येथे निवास व्यवस्था केली. भास्कर कॉलनी येथे राहणाºया सागर देशमुख याने अनेक नागरिकांना आपल्या गाडीवरुन सोडले.