शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि.प. अध्यक्षांची सोमवारी निवड ; सेनेच्या महिला अध्यक्षा बिनविरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:33 IST

या जि.प. अध्यक्षांच्या या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रस आणि भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. सेनेच्या मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभाएसटी महिला प्रवर्गातील सदस्येची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता जिल्हा परिषदेत आता विरोधी पक्ष उरलेला नाही

ठाणे : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवड २६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वा. केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभा जिल्हा नियोजन भवनमधील समिती सभागृहात आयोजित केली आहे. शिवसेनेसाठी हे अध्यक्ष सोडलेले असल्यामुळे या पक्षाच्या एसटी महिला प्रवर्गातील सदस्येची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे.          या जि.प. अध्यक्षांच्या या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रस आणि भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. सेनेच्या मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त आहे. या रिक्त अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारले जाणार आहे. यानंतर दुपारी ३ वा. नामनिर्देशनपत्रांची छाननी. या छाननीनंतर १५ मिनिटे उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार असल्याचेजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमधून एसटी महिलेला उमेदवारी दिली जाणार आहे. यासाठी भिवडी तालुक्यातील वाफे येथील दिपाली पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अध्यक्ष पदी पाटील यांची बिनविरोध निवड करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे.

          आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेने या जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह सभापती पद आधीच दिलेले आहे. याशिवाय भाजपाला काही काळ सत्तेबाहेर ठेवून आता एक सभापती पद दऊन सत्तेत सहभागी करून घेतले. जिल्हा परिषदेत आता विरोधी पक्ष उरलेला नाही. यामुळे सेनेच्या पाटील यांच्या विरोधात कोणी उमेदवारी दाखल करण्याचा धोका पत्करणार नसल्याचे ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद