शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Thane: सत्कार की कारवाई तुम्हीच ठरवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2023 22:28 IST

Eknatrh Shinde: जिथे दिरंगाई आणि निष्काळजीपणा आढळेल, तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला.

- जितेंद्र कालेकर

ठाणे - येणाऱ्या पावसाळ्यात ठाण्यातील ज्या प्रभागात रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, लोकांची गैरसोय होणार नाही, अशा प्रभागातील अधिकाऱ्यांचा आपण सत्कार करू, मात्र जिथे दिरंगाई आणि निष्काळजीपणा आढळेल, तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला. ठाण्यातील रस्त्यांच्या तसेच नालेसफाईच्या कामांची पाहणी करीत असताना टिकुजिनी वाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना कामगारांना सुरक्षा साधने न पुरविणाऱ्या कंत्राटदाराला शिंदे यांनी तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली.

वर्तकनगर, पोखरण रोड क्रमांक-एक येथील कानवूड जंक्शन, पवारनगर आणि त्यानंतर टिकुजीनीवाडी ते निळकंठ रस्ता तसेच बटाटा कंपनी, मानपाडा आणि कोरम मॉल मागील नाला आदी ठिकाणच्या नाल्यांची आणि रस्त्यांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्ताच्या डांबरीकरण कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पोहोचले. त्यावेळी या कंत्राटदाराने कामगारांना हॅन्ड ग्लोव्हज आणि हेल्मेट अशी सुरक्षा साधने दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा शिंदे यांनी दखल घेत तातडीने कंत्राटदारावर कारवाईचे आदेश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनविणारे कामगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी कंत्राटदाराला खडसावले.

या पाहणी दाैऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेत असून रस्ते, पदपथ आणि नालेसफाईच्या कामांचा यात समावेश आहे. १३४ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे केली जात असून यात काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि यूटीडब्ल्यूटीद्वारेही चांगल्या दर्जाची कामे हाेत आहेत. आयआयटीला रस्त्यांच्या कामांचे नमुने पाठविले जाणार असून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे.एका खड्ड्याला एक लाखांचा दंड ठेकेदाराला भरावा लागणार आहे. त्यामुळे चांगल्या कामांवर ठेकेदारांचा भर आहे. नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळयात खड्ड्यांचा त्रास सामान्य नागरिकांना नको, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

जिथे कामात दिरंगाई होईल, तेथे जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला. ठाणे शहरात काही ठिकाणी चांगल्या प्रकारे कामे सुरू आहेत. त्याचे कौतुकही त्यांनी केले.कोरोना काळात महापालिकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ६०० कोटी दिले आहेत. या निधीमधून शहरात चांगली कामे होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सांगितले. ठाणेकरांच्या सुविधेकरिता रस्त्यांच्या कामावर भर दिल्याचे ते म्हणाले.

क्लस्टरमुळे चांगल्या दर्जाची घरे मिळतील-क्लस्टरचे काम सर्वसामांन्यासाठी सुरू आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची घरे मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा टोला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. म्हाडा उत्तम काम करीत असल्यामुळे म्हाडाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले. या पाहणी दौऱ्यात पालिका आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांचा समावेश होता.

पाहणी दाैऱ्यात जेसीबी, पोकलेनने दिला दगामुख्यमंत्री शिंदे यांच्या नालेसफाई दौराच्या आधीच भीमनगर येतील नाल्यात पोकलेनचा अपघात झाला. नालेसफाई सुरू असताना पोकलेन नाल्यात रुतून उलटला. त्यामुळे ऐनवेळी शिंदे यांच्या दाैऱ्याचे ठिकाण बदलले. महापालिका अधिकाऱ्यांनी भीमनगर नाल्याच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. त्यामुळे भीमनगरच्या ऐवजी पोखरण दोन नंबर येथून दाैऱ्याला सुरुवात झाली. दुसऱ्या एका नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या जेसीबीचा टायर पंक्चर झाल्याने नालेसफाईत अडथळा निर्माण होत असल्याचे उघड झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे