शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: खासगी डान्स पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 22, 2023 20:37 IST

Thane Crime News: - खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

- जितेंद्र कालेकरठाणे - खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती गुन्हे शाखेने रविवारी दिली.

ठाणे शहर परिसरात तसेच वेगवेगळया ठिकाणी काही महिन्यांपासून डान्स शो, फोटोग्राफी, इव्हेंट शो आणि खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या तरुणींना तसेच महिलांना ग्राहकांसोबत शरीर विक्रयासाठी मुंबई, लोणावळा, गोवा आणि दमण अशा ठिकाणी नेले जाते. अशा फूस लावलेल्या मुली सेक्स रॅकेटसाठी महिला दलालाकडूनच पुरविल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रिती चव्हाण, जमादार श्रद्धा कदम, एन. डी. क्षीरसागर, डी. जे. भोसले, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, डी. एस. मोहिते, हवालदार के. डी. पाटील आणि व्ही. एच. पांडव आदींच्या पथकाने १९ ऑक्टाेंबर रोजी कॅडबरी जंक्शनवरील सेवा रस्त्यावर असलेल्या एका मॉलमध्ये बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. याच छाप्यात सेक्स रॅकेटसाठी आणलेल्या चार मुलींची महिला दलालाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात या दलाल महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मुलीसाठी ७० हजारांचा सौदायातील एका मुलीसाठी ग्राहकाबरोबर ७० हजारांचा सौदा ठरला होता. त्यातील २० हजार रुपये पिडित मुलीला तर उर्वरित ५० हजारांची रक्कम ही दलाल महिला स्वत:साठी घेणार होती, अशी माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेचे आणखी काेणी साथीदार आहेत का? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी