शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ठाणे ठरवणार पदवीधर आमदार, मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:33 IST

मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत.

ठाणे  -  मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ८३४ मतदारांची नोंद झाली आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत असून तिन्ही महत्त्वाचे उमेदवार हे ठाण्यातीलच आहेत, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीचे रंग भरू लागले आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टÑवादीचे नजीब मुल्ला हे प्रमुख तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाकडून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर राष्टÑवादीतर्फे स्वत: शरद पवार रिंगणात उतरले असून ‘गद्दाराला धडा शिकवा’, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यापैकी कुठल्या नेत्याच्या पारड्यात यश, तर कोणाच्या पारड्यात अपयश टाकायचे, हे ठाणेकर मतदार ठरवणार आहेत.मागील निवडणुकीत या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास मतदार होते. त्यावेळेसही ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ हजारांच्या आसपास होती. नव्याने मतदारनोंदणी झाली, त्यानुसार या मतदारसंघात आता एक लाख सात हजार २६४ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या तब्बल ४५ हजार ८३४ आहे. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ हजार ९८२ एवढी आहे. त्यामुळे या ठिकाणी बविआची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मतदारांची संख्या ठाण्याखालोखाल म्हणजे १९ हजार ९१८ एवढी आहे. याठिकाणी शेकापचा वरचष्मा असून त्यांनी राष्टÑवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व असून याठिकाणी मतदारांची संख्या १६ हजार २२२ एवढी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाच हजार ३०८ एवढी आहे. याठिकाणी नारायण राणे यांचा पगडा असून त्यांच्या स्वाभिमानी पक्षाने निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. तटकरे यांचे पुत्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना राणे यांचे समर्थन मिळवले होते. तसेच समर्थन आता राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना मिळेल, अशी अपेक्षा बाळगली होती. परंतु, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली आहे.ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांचा विचार केल्यास जिल्ह्यात शिवसेना तसेच भाजपाला समसमान यश लाभले आहे. काही ठिकाणी शिवसेना, तर काही ठिकाणी भाजपा वरचढ ठरली आहे.शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारभातसानगर : कोकण पदवीधर मतदार संघासाठी शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारांनी आपली नावे नोंदवली असून यामध्ये ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले असले तरी शहापूर तालुक्यातील मतदार निर्णायक ठरणार आहेत. विद्यार्थी बेकारी भत्ता मिळत नाही, तालुक्यात कारखाने मोठ्या संख्येने असून तेथे स्थानिकांना आरक्षण मिळावे यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही अशा येथील समस्या आहेत.भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी स्वाभिमानी पक्षाचे नेते खा. नारायण राणे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. ही विनंती राणे यांनी मान्य केल्याने तळकोकणातील राणे यांच्या पक्षाने नोंदवलेल्या पदवीधरांची मते डावखरे यांना मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डावखरे यांच्याकरिता ही लढत अटीतटीची असून, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्र