शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, वसई, मीरा रोड मार्गावर कोंडी, चाचणीसाठी जुना वरसावे पूल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 05:25 IST

या काळात वाहनांसाठी नव्या वरसावे पुलाचा पर्याय खुला ठेवला होता. पुलाच्या चाचणी कामामुळे वाहनचालकांना सात तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वरसावे पुलाची चाचणी घेण्याच्या कामामुळे हा पूल गुरुवारी सकाळी १० ते सायं. ५ असा ७ तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला होता. या काळात वाहनांसाठी नव्या वरसावे पुलाचा पर्याय खुला ठेवला होता. पुलाच्या चाचणी कामामुळे वाहनचालकांना सात तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वरसावे जुना पूल हा मुंबई आणि गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. सध्या पुलाच्या चाचणीचे काम असल्यामुळे गुुुरुवारी रस्ते महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून हा महामार्ग सात तास बंद ठेवण्यात आला होता. तशा सूचना काही दिवस आधीच दिल्या होत्या. तरी या काळात ठाणे, वसई आणि काशिमीरा या तिन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने चालकांची या कोंडीतून सुटका होत होती. वसई तालुक्यातून जाणाºया महामार्गावरील मालजीपाडा, मीरा रोड या मार्गांवर दहिसर चेकनाका तसेच ठाणे मार्गावर चेना ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहने आणि गुजरातहून मुंबईत दाखल होणारी वाहने यांनाही वाहतूककोंडीचा फटका बसला. संध्याकाळी ५ नंतर चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वाहतूक हळूहळू सुरळीत सुरू होत होती.बारावीच्या विद्यार्थ्यांचे हालपूल बंद ठेवल्याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला. कोंडीत अडकलेल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. परीक्षा सुरू आहेत, हे माहीत असतानाही प्रशासनाने असा निर्णय घ्यायला नको होता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.