शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर लसवंत! लसीकरणाचा टप्पा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होणार; दुसरा डोस ६६ टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:48 IST

लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे. त्यानुसार आता येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात लसीकरणाचा पहिला डोस घेण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल असा दावा ठाणे  महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. तर दुसऱ्या डोसचे लक्ष देखील ६६  टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे  महापालिका हद्दीत जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेला सुरवात झाली आहे. त्यानुसार महापालिकेला सुरवातीच्या टप्यात कमी अधिक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत होता. त्यामुळे तुरळक केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरु होती. त्यानंतर दुसरी लाट ओसरु लागली आणि लसीकरणाचा साठा देखील पुरेशा प्रमाणात पालिकेला उपलब्ध झाला. त्यामुळे पालिकेने लसीकरण केंद्राची संख्या वाढवत ५४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण सुरु ठेवले. त्यानंतर आता ही संख्या ७० ते ९१ र्पयत गेली आहे. शुक्रवारी महापालिका हद्दीत तब्बल ९१ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु असल्याचे दिसून आले. परंतु लसीकरणाला मधल्या काळात गती येत नसल्याची बाबही दिसून आली होती. त्यावर उपाय म्हणून ठाणो महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरुपाचे उपाय देखील करण्यात आले. त्यानुसार दोन डोस घेतलेल्यांना परिवहनच्या बसमध्ये प्रवासाची मुभा, कर्मचा:यांचा पगार कपात करण्याचा निर्णय, केसपेपर काढण्यापूर्वी लस घेतली की नाही? याची खातरजमा याशिवाय इतर उपाय योजना देखील पालिकेने हाती घेतल्या होत्या.

परंतु आता कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याने लसीकरण मोहीमेलाही वेग वाढल्याचे दिसत आहे. मधल्या काळात ७ ते ८ हजारांच्या आसपासच रोजच्या रोज लसीकरण होतांना दिसत होते. आता मात्र लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे आता १४ ते १६ हजार लसीकरण रोजच्या रोज होतांना दिसत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा वेगही वाढला आहे.त्यात आता महापालिकेने मागील काही दिवसापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरु केले असून त्यांचे देखील आतार्पयत २३ हजार ३०३ मुलांचे लसीकरण झाले आहे.

१७ लांखाच्या लक्षाच्या जवळठाणे  महापालिकेने एकूण १७ लाख लोकसंख्येचे लक्ष लसीकरणासाठी ठेवले आहे. त्यानुसार आतार्पयत १४ लाख ४० हजार ७७३ जणांना म्हणजेच लक्षाच्या ८४ टक्के नागरीकांना पहिला डोस दिला आहे. तर दुसरा डोस १० लाख ९५ हजार ५८६ जणांना देण्यात आला आहे. त्यानुसार हे प्रमाण ६६ टक्के एवढे आहे.

लसीकरण तक्तालस - पहिला डोस - दुसरा डोसहेल्थ वर्कर - २७८५७  - १८५९४फ्रन्ट लाईन वर्कर - ३१५१२ - १८५८९१८ वयोगटापुढील - ८३५१९२ - ६५७५४२४५ ते ६० - ३१५१०६ - २५७६५७६० वयोगटापुढील - २०७८०३ - १४३२०५१५ ते १८ वयोगट -२३३०३  -००००

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस