शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मतदारसंघात दोनच उमेदवार उच्चशिक्षित, कोणत्या मेरिटवर होते मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:47 IST

लोकसभा निवडणुकांसाठी ठाणे मतदारसंघातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

- अजित मांडकेठाणे : लोकसभा निवडणुकांसाठी ठाणे मतदारसंघातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. यामध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच कमी असल्याचे चित्र आहे. २३ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवार पदवीधरदेखील झालेले नाहीत. तर ८ टक्के जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत.राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. परंतु, प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण २६ टक्के एवढे आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची पाहणी केली असता ही बाब समोर आली आहे. ठाणे मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २६ टक्के उमेदवार हे पदवी तर पदव्युत्तर ०८ टक्के उमेदवार तर अवघ्या ६ उमेदवाराकडे पदवी आहे.

>कला शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयातील सर्वाधिक पदवीधरांचा समावेश आहे. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ३ उमेदवार हे कला पदवीधर, तर ३ उमेदवार हे वैद्यकीय आणि विज्ञान पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
>उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा मोठा मतप्रवाह आहे. मात्र, अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसते. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार अपक्ष आहेत. यातील अवघे २८ टक्के उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर आहेत. ९ टक्के उमेदवार हे बारावी तर उर्वरित उमेदवार दहावी उत्तीर्णच आहेत. केवळ एका उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.>मतदार देतात का राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर भर?>कला विषयांतीलसर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत १३ टक्के उमेदवार हे कला विषयांतील पदवीधर आहेत. त्यामुळे कला शाखेतील उमेदवार हे निवडणुकीत मतदारांचा कौल कसा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.>पदव्युत्तर दोन उमेदवारएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या अवघी २ एवढी आहे. त्यामुळे एकूण उमेदवारांच्या प्रमाणात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण हे केवळ ८ टक्के एवढे आहे. त्यामुळे लोकशाहीत उच्चशिक्षिताला आता किती प्राधान्य मिळणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.>४ ते १० वी पास अधिकएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये चवथीपासून ते १० पर्यंत शिक्षण घेणारे हे १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे एकूणच उमेदवारांच्या प्रमाणात अल्पशिक्षित उमेदवारांचा टक्का ४४ एवढा आहे. तर १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या २ एवढी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे