शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहन : ठाणेकर प्रवाशांना लवकरच मिळणार १५० नव्या बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:28 IST

ठाणे परिवहनसेवेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प १२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा पालिकेकडे १५० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे परिवहनसेवेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प १२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा पालिकेकडे १५० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. जीसीसीच्या माध्यमातून ठाणेकरांना अतिरिक्त १५० बसेस उपलब्ध होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परिवहनमार्फत मागील वर्षी ३८१ कोटी २६ लाख रु पयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा हा अर्थसंकल्प ४५० कोटींच्या घरात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही महिन्यांपासून परिवहनसेवेला जीसीसीचा आधार मिळाल्याने सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. परिवहनच्या बसेसने अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. परिवहनचे उत्पन्न हे २२ लाखांवरून ३० लाखांच्या घरात गेले आहे. परंतु, परिवहनच्या स्वत:च्या ताफ्यात असलेल्या बसेस फारशा रस्त्यावर उतरत नसल्याने टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे परिवहनच्या १५० बसेस आता जीसीसी तत्त्वावर रस्त्यावर उतरणार आहेत. या बसेसच्या दुरुस्तीसाठी ८.५० कोटींचा निधी खर्च होणार असून त्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. येत्या काळात ठाणेकरांना परिवहनच्या ताफ्यातील १२६, जीसीसीच्या नव्या २०० बसेस आणि आता दुरुस्त होऊन जीसीसीवर धावणाऱ्या १५० बसेस अशा तब्बल ४७६ च्या आसपास बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना चांगली सेवा मिळेल, असा दावा अंदाजपत्रकातून करण्यात आला आहे.परिवहनची वाटचाल खाजगीकरणाकडेमागील वर्षीच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या ५० तेजस्विनी बसेस या मार्चअखेर सेवेत दाखल होणार असल्याने त्याचाही अंतर्भाव यावर्षी ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.याशिवाय, १०० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्या, तरी या बसेसवर जाहिराती करण्यात येणार आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्याचा अंतर्भाव केवळ परिवहनच्या उत्पन्नात करण्यात येणार आहे.परिवहन जीसीसीसाठी पालिकेकडे १५० कोटींचे अनुदान मागणार आहे. मंगळवारी सादर होणाºया अंदाजपत्रकात परिवहनची खाजगीकरणाकडे वाटचाल दिसत असून प्रवाशांवर यंदा तिकीटवाढीचा बोजा पडणार नाही.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे