शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; तिकीट दरवाढ नाही, डबल डेकरने प्रवास होणार सुसाट

By अजित मांडके | Updated: February 8, 2024 18:38 IST

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडात दुप्पट वाढ, ६९४ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे परिवहन सेवेचा २०२३ - २४ चा सुधारीत ४२७.१९ कोटींचा आणि २०२४-२५ चे ६९४ कोटींचा मुळ अंदाजपत्रक गुरुवारी ठाणे परिवहन सेवेने सादर केले. या अंदाजपत्रकानुसार ठाणेकरांचा प्रवास येत्या काळात गारेगार आणि डबल डेकर इलेक्ट्रीक  बसमधून होणार असून ठाणेकरांना डिजीटल तिकीट प्रणालीचाही लाभ होणार आहे. तर यंदा देखील तिकीट भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे. इलेक्ट्रीक बसची संख्या वाढविण्याबरोबर कर्मचाऱ्यांची थकबाकी देणे आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. तर फुकट्या प्रवाशांना चाप बसावा या उद्देशाने दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ प्रस्तावित कवण्यात आली आहे.

गुरुवारी वागळे इस्टेट येथील परिवहनच्या सभागृहात परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहन सभापती विलास जोशी यांना सादर केला. परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रीक बसपैकी ११४ बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरीत बस या २०२४ अखेर दाखल होणार आहेत. ठाणेकरांना येत्या काळात डबल डेकर बसमधून प्रवासाची हमी परिवहन प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ४४६ बस असून आगामी काळात पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत १०० व एनसीएपी अंतर्गत १५ व्या वित्तआयोगा अंतर्गत ८६ पुढील आर्थिक वर्षात दाखल होणे अपेक्षित आहे. तसेच जेएनएनयुआरएमअंतर्गत प्राप्त झालेल्या १९० आणि ५० महिलांकरीता तेजस्वीनी बस व १२३ इलेक्ट्रीक बस अशा मिळून ३६३ बस ठाणेकर नागरीकांना सेवा देत आहेत. आगामी दोन वर्षात १८६ इलेक्ट्रीक बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत.

वाहतुकी पासूनचे अपेक्षित उत्पन्न - परिवहनच्या ताफ्यातील ४५ बसपोटी १४ कोटी १९ लाख, जेएनएनयुआरएम अंतर्गत १९० बसपोटी ६२.७१ कोटी, वातानुकुलीत वोल्वो १५ बसपोटी ५ कोटी ५३ लाख, ५० तेजस्वीनी बसमधून १२ कोटी ३६ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. १२३ इलेक्ट्रीक बसपोटी ३६.६९ कोटी, पीएम योजनेअंतर्गत १०० बसपोटी १६ कोटी ३८ लाख, मिडी २० सीएनजी बसपोटी ४ कोटी ६३ लाख तसेच ४२ इलेक्ट्रीक बसपोटी ५ कोटी ९१ लाख असे १५८ कोटी ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट व ठामपाकडून दिलेल्या सवलतीपोटी अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. पोलीस कर्मचाºयांना प्रवासात देण्यात येत असलेली सवलत २०२२-२३ या वर्षात २१ आॅक्टोबर २०२२ पासून शासनाकडून बंद करण्यात आली आहे. परंतु २०२८-१९ ते २१ आॅक्टोबर २२ सवलत बंद केल्याने कालवधी पर्यंतची प्रलंबित रक्कम परिवहनला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

२०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ही १८ लाख ११ हजार इतकी असून १ लाख लोकसंख्येस ३० बस या प्रमाणे आजमितीस शहराची अंदाजे लोकसंख्या सुमारे २३ लाख इतकी विचार घेता परिवहला ७९३ बसची आवश्यकता असतांना शहरात केवळ ३६३ बस धावत असल्याचे अंदाजपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

महसुली खर्चाबाबत

वेतन व भत्ते खर्च - टीएमटीमधील अधिकारी, कर्मचारी वेतन व निवृत्तीधारकांचे पेंशन, थकबाकी व इतर अदायगीसाठी ३६४ कोटी ५७ लाख व इतर प्रशासकीय खर्चासाठी २ कोटी १० कोटी इतकी तरतुद

सेवा निवृत्ती निधीबाबत - डिसेंबर २०२३ अखेर एकूण १०३३ निवृत्तीधारक व जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत आणखी १४३ कर्मचारी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांना उपदान, रजावेतन व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी ५२.९८ कोटी खर्च अपेक्षित, २०२४-२५ या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतन व उपदान अदायगीपोटी अंदाजपत्रकात मागणी करण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्ती कर्मचाºयांचे थकीत उपदान व रजा वेतन यासाठी २३ कोटी २२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वाहन दुरुस्ती व निगा साठी ९ कोटी ४२ लाख, सीएनजी ६ कोटी ५४ लाख व वंगण खरेदीसाठी ७० लाख, डिझेल खरेदीसाठी १५ कोटी ३१ लाख, सरकारी कर ८ कोटी २० लाख इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची थकबाकी - डिसेंबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणाºया फरकाच्या रकमेसह १२३ कोटी ८८ लाख इतकी रक्कम देणे प्रलंबित आहे. वाहनांचा विमा विधी विभागाकडील प्रंलबित विमा दावे व इतर सरकारी कर २ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

जीसीसी अदायगी - जेएनएनयुआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या २४०, २६५ इलेक्ट्रीक बस अशा एकूण ५०५ बसच्या अदायगीसाठी २१४ कोटी ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एनसीएपी अंतर्गत केंद्रशासनाच्या १५ व्या वित्तआयोगानुसार बस वेट लिज तत्वावर घेण्यासाठी ४१ कोटी ८७ लाख प्राप्त होणाºया अनुदान रकमेची जमा व खर्चाच्या तरतूद केल्या आहेत. कोलशेत, आनंदनगर, दिवा, विाटावा, गावदेवी, पातलीपाडा, बस टर्मिनस विकसित करण्याबाबत रक्कम २० कोटी भांडवली कामे या स्वरुपात तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्न वाढीचे स्त्रोत

प्रवासी संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न, परिवहनच्या ताफ्यात मोठ्या संख्येने मिडी बस घेऊन शहरी व ग्रामीण भागात सोडल्या जाणार आहेत. असे मार्ग सेवा पाहणी करुन त्यामार्गांवर बस फेऱ्यांचे नियोजन, खाजगी बसचा वापर करण्याऐवजी परिवहनच्या बसचा वापर करण्याबाबत डिजीटल माध्यमातून आवाहन, सेवाजेष्ठ कर्मचाºयांना व स.वा. निरिक्षक या पदाचा पदभार देऊन मार्ग तपासणी कार्यक्रमावर भर दिला जाणार आहे.

विना तिकीट प्रवास भोवणार

ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांना अंकुश घालण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार यापूर्वी विनातिकीट प्रवास केल्यास १०० रुपये दंड आकारला जात होता. मात्र आता त्यात दुपट्ट वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून ही रक्कम २०० एवढी करण्यात आली आहे. तसेच तिकीट भाडेही त्यात वसुल केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेकडून ४५२ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा

ठाणे परिवहन सेवेने पुन्हा एकदा अनुदानासाठी महापालिकेकडे हात पसरले आहेत. मागील वर्षी पालिकेने महसुली अनुदानपोटी १७० कोटी व संचलन तुट ६० कोटी इतके अनुदान मंजुर करण्यात आले होते. पैकी नोव्हेंबर २०२३ अखेर १०२.७३ कोटी व संचलन तुटीपोटी ३४.७६ कोटी असे १३७.४९ कोटी अनुदान प्राप्त झाले होते. तर पुढील महिन्यांकरीता खर्च भागविण्यासाठी महसुली तुट ६९.८१ कोटी व संचलन तूट ३२.२२ कोटी अशी १०२ कोटी ३ लाख रकमेची आवश्यकता असून सुधारीत अंदाजपत्रकात ही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय २०२४-२५ या आर्थिक वर्षात महसुली व भांडवली रक्कम ३४८.८२ कोटी व संचलन तुट अनुदानापोटी १०३.६६ कोटी अशी ४५२ कोटी ४८ लाखांची मागणी महापालिकेकडून अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यातही यात वेतन खर्च, निवृत्ती वेतन खर्च, सानुग्रह अनुदान, वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता, कर्मचारी थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचारी थकबाकी, भविष्य निर्वाह निधी व्याजातील तफावत आदींचा समावेश आहे. तर भांडवली खर्चात सुरक्षा विभागाकडील खरेदी, आगार बांधकाम व संचलन तुटीत १९० जीसीसी अदायगी मधील तुट, ५० तेजस्विनी बसची अदायगी मधील तुट, आदींचा यात समावेश आहे.

डिजीटल तिकीट संकल्पना

प्रवाशांची संख्या वाढविण्याबरोबर प्रवाशांना आता सुटे पैसे खिशात ठेवण्याची गरज पडणार नाही. एसटी प्रमाणे ठाणे परिवहन सेवेमार्फत येत्या महिनाभरात डिजीटल तिकीटींग संकल्पना राबविली जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका