शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या एक्स्प्रेसमध्ये ठाण्यात तरुणीची छेडछाड; टिष्ट्वट करून केली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:33 IST

ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानका त दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यांना टिष्ट्वट करून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांसह लोहमार्ग पोलिसांची धावाधाव ...

ठळक मुद्देठाणे स्थानकात पहाटेची घटनाअखेर गुन्हा दाखल 

ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यांना टिष्ट्वट करून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांसह लोहमार्ग पोलिसांची धावाधाव झाली.तर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, फलाट क्रमांक-६ वर सीसीटीव्ही नसल्याची बाब पुढे आली आहे.नालासोपारा येथे राहणारी अठरावर्षीय तरुणी ही बीएमएमची विद्यार्थिनी आहे. शनिवारी ती भुवनेश्वर येथून मुंबईला येण्यासाठी कोणार्क एक्स्प्रेसमध्ये बसली. पहाटे सव्वातीनच्या दरम्यान ही एक्स्प्रेस ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक-६ येथे आली. ही गाडी ठाण्यातून मुंबईकडे रवाना होताना एक अनोळखी या धावत्या गाडीत बोगी क्र. बी-१ मध्ये शिरला. त्या बोगीत असलेल्या या संबंधित तरुणीची छेडछाड काढून तो क्षणात फलाटावर उतरला. या तरुणीने दादर येथे उतरल्यावर झाल्या प्रकाराबाबत टिष्ट्वट करत मुंबई पोलीस आयुक्त आणि काही वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली.मुंबई पोलीस आयुक्तांना टिष्ट्वट केल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांसह शहर पोलिसांची दिवसभर धावाधाव सुरू होती. याबाबत शहर पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून या प्रकाराबाबत असे काही झाले का, याची खातरजमा करून घेतली. तर, हा प्रकार रेल्वे स्थानकात झाल्याने लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मात्र, फलाट क्रमांक-६ वर सीसीटीव्ही कॅमेराच नसल्याची बाब पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.याबाबत टिष्ट्वटवर तक्रार करण्यात आली त्यानुसार,विनयभंग प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीद्वारे त्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. 

टॅग्स :thaneठाणेRailway Passengerरेल्वे प्रवासीCrimeगुन्हा