शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाचा टोईंग व्हॅनचा कारभार कंत्राटाविना - मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:24 IST

ठाणे शहरातील वाहनांवर ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाकडून टोईंगद्वारे करण्यात येणाºया कारवाईवर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देटोईंग व्हॅनचा कारभार कंत्राटाविना - मनसेचा आरोपफक्त २.५ कोटी रूपये शासनाकडे जमा झाले - मनसेवाहतूक विभागाच्या स्मार्ट कारभाराविषयी विचारणा करणार - मनसे

ठाणे : शहरातील वाहनांवर वाहतूक विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा गलथान कारभार असल्याचा आरोप करीत टोईंग व्हॅन बद्दलची ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाकडे कोणतीही माहिती नाही असे मनसेने म्हटले आहे. तसेच, गेल्या सात वर्षांत वाहतूक विभाग आणि टोर्इंग करणाºया व्हॅन मालकांमध्ये कोणताही करार झाला नसल्याची माहिती प्राप्त झाल्याचे मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.टोर्इंग व्हॅन वर काम करणाºया कर्मचाºयांबाबत सततच्या होणाºया तक्र ारींपासून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी वाहतूक विभागाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत मनसेचे पाचंगे यांनी माहिती मागविली होती. वाहतूक विभागाकडे टोर्इंग करणाºया कंत्राटदारासंदर्भात तसेच करारामध्ये वाहतूक शाखेने बंधनकारक केलेल्या अटी, शर्ती इत्यादी माहिती मिळणे अपेक्षित होते. वाहतूक विभाग आणि टोर्इंग करणाºया व्हॅन मालकांमध्ये कोणताही करार झाला नव्हता अशी धक्कादायक माहिती त्यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांत कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता फक्त २.५ कोटी रूपये शासनाकडे जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या या विभागात किती पारदर्शी कारभार होतो हे या निमित्ताने उघडकीस आले आहे. तसेच, उपायुक्त अमित काळे यांना टोर्इंग संदर्भात प्रश्न विचारले असता ठाणे शहरात टोर्इंगच बंद करतो मग लोकांना त्रास झाला की कळेल असे उर्मट उत्तर मिळाल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे. टोर्इंग सुविधा पुरविणे तुमचे कर्तव्य आहे आमचा विरोध टोर्इंगला नसून टोर्इंगच्या गलथान कारभाराला आहे असे उत्तर त्यांना दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले. सात वर्षांत फक्त २.५ कोटी रूपये दंडापोटी शासनाकडे जमा झालेत म्हणजे नक्कीच महसूल बुडविला जात आहे, शासनाकडे जमा होणारा महसूल आणि ठाणेकरांकडून वसूल केला जाणारा दंड यात प्रचंड तफावत आहे, इतका कमी महसूल जमा होऊच शकत नाही असा गंभीर आरोप मनसेचे पाचंगे यांनी केला आहे. मनसे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वाहतूक विभागाच्या स्मार्ट कारभाराविषयी विचारणा करणार आहे. वाहतूक विभागाचे उपायुक्त काळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कारभार स्वीकारल्यानंतर टोर्इंग व्हॅन मालकांशी करार करण्यास सुरवात केली आहे असे सांगितले असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.याबाबत उपायुक्त काळे यांच्याशी संपर्क केला असता अद्याप त्यांची  प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणtraffic policeवाहतूक पोलीस