शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत बॅग न दिल्याने ठाण्यात दुकानदारासह तिघांना मारहाण: तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:29 IST

ठाण्याच्या एका दुकानदाराने मोफत बॅग न दिल्याच्या रागातून मालकासह त्याच्या दोन नोकरांनाही जबर मारहाण करणा-या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे मद्य प्राशन करुन तिघांचा दुकानात धिंगाणानोकराकडे केली मोफत बॅगेची मागणी नोकरासह मालकालाही जबर मारहाण

ठाणे: मोफत बॅग न देणा-या विक्रेत्यास आणि त्याच्या मालकाला तसेच अन्य एका नोकराला जबर मारहाण करुन शिवीगाळ करणा-या रवी खरे, उमेश विश्वकर्मा आणि प्रविण जाधव उर्फ लाल्या जाधव (रा. कैलासनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.कैलासनगर येथे विजय ट्रेडर्स हे विजय पटेल यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रवि खरे हा आपल्या साथीदारांसह मद्य प्राशन करुन वसंत ट्रेडर्स या दुकानासमोर आला. तिघांनीही आपसात संगनमत करुन या दुकानातील विक्रेता शंभाक सिंग याच्याकडे मोफत एका बॅगेची मागणी केली. ती देण्यास त्याने स्पष्ट नकार दिल्याने त्यांनी सिंगला शिवीगाळ करुन मारहाण केली. हा प्रकार त्याने दुकानाचे मालक पटेल यांना कळविला. तेंव्हा पटेल यांनीही दुकानात धाव घेऊन त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही न जुमानता रवि, उमेश आणि प्रविण या तिघांनीही पटेल यांच्यासह शुभांक आणि अजित सिंग या नोकरांनाही जबर मारहाण करुन शिवीगाळ केली. प्रविण याने तर रस्त्यावरील वीट उचलून पटेल यांच्या कपाळावर मारुन त्यांना जखमी केले. तिघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याच दरम्यान, त्यांची जामीनावर सुटका झाली.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे