शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खासगी शिक्षकांचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:22 IST

महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत.

ठाणे- महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत. या अटीनुसार सर्वसामान्य क्लासेसची फीवाढ होणार आहे. ही सर्वसामान्य पालकांना फी परवडणार नाही. यांचा दुष्परिणाम महाराष्ट्रातील ५०००० पेक्षा जास्त सर्वसामान्य क्लासेसवर होणार आहे. यामुळे जवळ जवळ १० लाख शिक्षक व इतरकर्मचारी बेरोजगार होणार असून, त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.या संबंधी शैक्षणिक विभागाला वारंवार पत्र व्यवहार केला तरी सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही. या कारणास्तव शासनाचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पालक, क्लासचे संचालक बहुसख्य आजि- माजी विद्याथी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ५००० ते ६०००च्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये घरगुती शिकवणी घेनाऱ्या महिला शिक्षकांचा मोठा समावेश होता. महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाण्यात खाजगी क्लासेसचा असा हा भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चामध्ये शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चेकरांनी काळया रंगाच्या टोप्या, काळे झेडे, निषेध फलक दाखवून आपला निषेध व्यक्त केला. मोर्चा अत्यंत शांतीप्रिय, शिस्तीत व स्वच्छतेचे भान ठेवून निघाला. तसेच मा.सौ. वंदना सूर्यवंशी (उप जिल्हाधिकारी) यांच्याकडे शासनाने गठीत केलेली समिती बरखास्त करणे आणि इतर संघटनेच्या सर्व सामान्य क्लास संचालक यांना नवीन समितीमध्ये स्थान मिळण्याची मुख्य मागणी करण्यात आली.तसेच निवेदनाच्या माध्यमातून मा. मा.सौ. वंदना सुर्यवंशी (उप जिल्हाधिकारी) आमच्या या मागण्यांचा पुन्हा योग्य विचार केला नाही तरभविष्यात या पेक्षा अधिक तिव्रतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल. दुसरे आंदोलन हे महाराष्ट्रातील सर्व क्लासचे शिक्षक मिळून मंत्रालयावर धडकणार. यानंतर होणाऱया परिणामास शासन जबाबदार असेल असे ठणकावून सांगण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व कोचिंग क्लासेस संघटनेने केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिष देशमुख, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण,उपकार्याध्यक्ष रविंद्र प्रजापती,ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल काकुळते,ठाणे शहर सचिव विनोद हादवे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुदेश आरगोंडा,खजिनदार सुनिल सोनार, उपखजिनदार मिलिंद मोरे, मुलुंड भांडूप विभागाध्यक्ष सुखदेव जाधव, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष शरद बागवे, भरत जगताप, बबन चव्हाण, तावडे सर, सुभाष माळकर, मनोज यादव, राज सर,कदम सर, परेश कारंडे, भूषण सर, महिला शिक्षीका सौ. पुर्वा माने, सौ. अंजली आरगेंडा, सौ.सुरेखा पाटील, सौ. भारती देशमुख, सौ. रुपाली सरोदे, सौ. मिनाक्षी काकुळते, इत्यादी उपस्थित होते 

टॅग्स :Teacherशिक्षक