शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केली सात वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:46 IST

अनेक व्यवहार आता पूर्वपदावर येत असतांनाच चोरटयांचाही सुळसुळाट सुरु झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या ठिकाणी उभी केलेली सात वाहने शहरातील विविध भागांमधून चोरटयांनी गेल्या दोन दिवसांमध्ये लांबविली आहेत.

ठळक मुद्दे दुचाकीसह रिक्षाचाही समावेश ‘अनलॉक’नंतर चोरटयांचाही सुळसुळाट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली अनलॉकची प्रक्रीया आता वेगाने सुरु आहे. अनेक व्यवहार आता पूर्वपदावर येत असतांनाच चोरटयांचाही सुळसुळाट सुरु झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या ठिकाणी उभी केलेली सात वाहने शहरातील विविध भागांमधून चोरटयांनी गेल्या दोन दिवसांमध्ये लांबविली आहेत. यामध्ये दुचाकी आणि रिक्षा यांचाही समावेश आहे. असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली वाहने भरदिवसाही चोरीचे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत. ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव जवळील अण्णा मद्रासी चाळीत राहणारे अमित चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी चंदनवाडी परिसरात त्यांची रिक्षा उभी केली होती. ही रिक्षा चोरट्यांनी बनावट चावीच्या आधारे चोरली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत कळवा पारसिकनगर भागात राहणाºया विद्याधर प्रभू यांनी त्यांची रिक्षा १५ सप्टेंबर रोजी पारसिकनगर येथील रघुकुल सोसायटीसमोर उभी केली होती. या रिक्षाचीही चोरी झाली आहे. याप्रकरणीही १९ सप्टेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, टिटवाळा येथे राहणारे जगजीत सिंग यांनी त्यांची एक लाख दहा हजारांची मोटारकार कळव्यातील ‘राणा टॉवर’च्या मागे उभी केली होती. दरम्यान, अशाच प्रकारे शुक्र वार आणि शनिवारीही चार वाहने चोरीस गेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिकडेच कोपरी पोलिसांनी दुचाकी चोरणा-या टोळीला जेरबंद केले होते. तरीही वाहन चोरीचे प्रकार वाढत असल्याने वाहन धारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी