शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

By जितेंद्र कालेकर | Updated: October 4, 2024 22:01 IST

Thane Crime News: काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ याला तसेच त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

-जितेंद्र कालेकरठाणे - काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे (३५, रा. संचार सोसायटी, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे) याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४, रा. जांभळी नाका, ठाणे) याला तसेच त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतल्याची माहिती काेपरी पाेलिसांनी शुक्रवारी दिली. आपल्या मैत्रिणीला ताे काही अश्लील फाेटाेंच्या आधारे ब्लॅकमेल करीत असल्यामुळे त्याचा खून केल्याचे त्याने प्राथमिक चाैकशीत सांगितल्याचे पाेलिसांनी सांगितले.

काेपरीतील संचार साेसायटीत स्वयम यांचा खून झाला, त्यावेळी आराेपी मयुरेश हाही त्याठिकाणी हाेता. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काेपरीतील चेंदणी काेळीवाडा भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसाेबत २८ एप्रिल राेजी एका लग्न समारंभात स्वयम याची ओळख झाली हाेती. याच ओळखीचा फायदा घेत त्याने तिला कारमध्ये बसवून फिरायला जाऊ, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध दिले हाेते. तिने ते प्यायल्यानंतर ताे तिला घरी घेऊन गेला हाेता. त्यावेळी त्याने या तरुणीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले होते. त्यानंतर ताे तिला ‘भेटायला ये’ असे मेसेज करून कायम ब्लॅकमेल करीत होता. हीच माहिती तिने तिचा जांभळी नाका भागात राहणारा मित्र मयुरेश याला दिली हाेती. त्यानंतर ही तरुणी आणि मयुरेश यांनी स्वयम याला तिचे काढलेले फोटो डिलीट करण्यास समजावून सांगितले. मात्र, यातूनच त्यांच्यात ४ ऑक्टाेबर राेजी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्वयम आणि मयुरेश यांच्यात चांगलाच वाद झाला.

याच वादातून स्वयम याच्यावर काेयत्याने डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याची कबुली मयुरेश याने पाेलिसांना दिली. या प्रकरणामध्ये मयुरेश आणि त्याची मैत्रीण या दाेघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली जाणार असल्याचे काेपरी पाेलिसांनी सांगितले. मयुरेश याने स्वयम याच्यावर काेयत्याचे ४० ते ५० वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे