शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: अंबरनाथमध्ये पाकीटमारामुळे ‘त्या’ पोलिसाने पाहिले अपुले मरण! श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून झाले हैराण, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:19 IST

Police News: मृतदेहाच्या खिशातून पोलिसांना एक पाकीट मिळाले. त्यात पोलिस प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पॅनकार्ड मिळाले. त्यामुळे हा मृतदेह सोनवणे यांचा असल्याचा निष्कर्ष काढून सव्वादहा वाजता कल्याण रेल्वे  पोलिसांत अपमृत्यूची नोंद  करण्यात आली.

डोंबिवली : अंबरनाथ रेल्वेस्थानकात सकाळी ८:४१ वाजता एक जण फलाट क्रमांक दोनवरून फलाट क्रमांक तीनवर रुळावरून जात असताना सुसाट जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पोलिसांनी छाया रुग्णालयात नेला. मृतदेहाच्या खिशातून पोलिसांना एक पाकीट मिळाले. त्यात पोलिस प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पॅनकार्ड मिळाले. त्यामुळे हा मृतदेह सोनवणे यांचा असल्याचा निष्कर्ष काढून सव्वादहा वाजता कल्याण रेल्वे  पोलिसांत अपमृत्यूची नोंद  करण्यात आली.

 ही बातमी कळताच सोनवणे यांच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळले. काहींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दुपारनंतर जेव्हा सोनवणे यांच्यापर्यंत त्यांच्याच श्रद्धांजलीचे मेसेज पोहोचले तेव्हा, त्यांना धक्का बसला.  सकाळी अंबरनाथ स्टेशनमध्ये रेल्वेत चढताना आपले पाकीट मारले गेले. पाकीटमारी करणाऱ्या चोरट्याचा अपघातात मृत्यू झाला असून, आपण जिवंत असल्याचा खुलासा सोनवणे यांनी केला. आगरी पाडा येथे ड्यूटीवर जात असताना प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पाकीट अंबरनाथ रेल्वेस्थानकात गर्दीचा फायदा घेत मारले होते.

...आणि सत्य उजेडात आले    या अपघातामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांची बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत तारांबळ उडाली. सोनवणे यांनी व्हायरल केलेल्या संदेशानंतर सत्य उजेडात आले.     सोनवणे यांनी संदेशात म्हटले आहे की, ते प्रदीप सुरेश सोनवणे, आगरी पाडा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून  बुधवारी सकाळी दिवस पाळीवर जात असताना अंबरनाथ स्टेशन येथे आले.     तेथून अंबरनाथ ते भायखळा प्रवासासाठी सकाळी ७:५१ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडत असताना त्यांचे पाकीट मारले गेले; परंतु लोकल सुरू झाल्याने त्यांना ट्रेनमधून उतरता आले नाही. ते पुढे निघून गेले.

मेसेजने मानसिक त्रासआपण सुरक्षित असून, आगरीपाडा पोलिस स्टेशन येथे ड्यूटीवर आहे. वरचेवर येणाऱ्या मेसेजमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून कोणीही माझ्या नावाचे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अंबरनाथमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मरण पावलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सोनवणे यांचे पॅनकार्ड असलेले पाकीट त्या व्यक्तीकडे सापडल्याने गोंधळ झाला.- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे

टॅग्स :PoliceपोलिसambernathअंबरनाथMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे