शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Thane: झाडे लावण्यासाठी सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले २० हजार सीड बॉल

By सुरेश लोखंडे | Updated: July 4, 2024 19:59 IST

Thane News: ठाणे जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सावराेली बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर विविध झाडांच्या बिया, माती, शेणखतापासून तब्बल २० हजार सीड बाॅल तयार करण्याचा अनाेखा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे  - जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सावराेली बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर विविध झाडांच्या बिया, माती, शेणखतापासून तब्बल २० हजार सीड बाॅल तयार करण्याचा अनाेखा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे. विविध झाडांच्या बियांचे हे सीड बॉल कृषी दिनी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते ठिकठिकाणी मातीत टाकले आहे.

जिल्हा परिषदेच्या या शाळेत ७४ विद्यार्थी पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे. पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना शाळेच्या शिक्षिका पूनम उबाळे यांनी राबवून त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे. र्या उपक्रमासाठी बीडीओंसह गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी, सहशिक्षक अरुणा शेलार, विजय उदार, सरपंच रोहन चौधरी, उपसरपंच शुभम चाभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ आणि सर्व पालक, ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे