शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

ठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:46 IST

जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देरविवारी पुन्हा सांयकाळी टिएमटीचा चक्काजाम कारवाई करुनही फेरीवाल्यांचे या भागात बस्तान

ठाणे - स्टेशन ते जांभळी नाका या भागातील फेरीवाल्यांना हटविल्यानंतर पहाटेच्या सुमारास बसणाऱ्या या रस्त्यांवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा अडथळा आता टिएमटीच्या बसेसला होऊ लागला आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे या भागात पाहणी दौरा घेऊन येथील भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती. परंतु रविवारी मात्र दुपार नंतर या भागात भाजी विक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडविल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टिएमटी बसेसच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. त्यामुळे येथील कारवाई बाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.          ठाणे येथील जांभळी नाक्यापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जाणाया मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम देखील जोरात राबविली होती. परंतु तरी देखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य दिसून येत होते. त्यामुळे आळी पाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरु आहे. परंतु असे असले तरी देखील आजही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या मात्र कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांचा आता टिएमटीच्या बसेसला देखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठ मार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु सुरवातीला फेरीवाल्यांचे आणि आता पहाटे या बाजारपेठीत बसणाºया भाजी विक्रेत्यांचा फटका आता परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्र ेते भाजी खरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ऐन सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला देखील याचा फटका बसत आहे. तसेच भाजी खरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता भितीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठराविक वेळेत बस पुर्वीच्या मार्गाने वळविण्याची मागणी केली. मात्र, बसचा मार्ग वळविल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडीक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहाणी केली. त्यानंतर बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरु केला आहे. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजी विक्र ेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजी विक्र ेत्यांचा बसच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सुत्रांनी सांगितले.                दरम्यान, पहाटेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देखील या भागातील फेरीवाल्यांची संख्या मात्र आजही कमी झालेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्कींग झाली होती. त्यामुळे जांभळी नाका ते स्टेशन पर्यंतच्या अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरांसाठी टिएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करते की या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त