शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत दारुसह २४ लाखांचा माल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: April 9, 2020 21:21 IST

दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांमध्ये ३९ आरोपींना अटकसंचारबंदीतही दाखल झाले ४९ गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. सर्व प्रकारच्या दारुची विक्री आणि निर्मितीही बंद आहे. तरीही या काळात दारुची निर्मिती करणा-या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या आदेशाने ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी मार्च महिना अखेरीस ते एप्रिलचा पहिला आठवडा या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये मद्य विक्री आणि निर्मितीप्रकरणी ४४ गुन्हे दाखल करीत २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणे जिल्हयात गावठी दारुची निर्मिती करणारी ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि अंबरनाथ येथील केंद्रे उद्ध्वस्त केली. तसेच बेकायदा मद्यविक्री होणार नाही आणि विषारी मद्यविक्री होऊन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी जिल्हाभर उत्पादन शुल्क विभागाने गस्त वाढविली. दरम्यान, २३ मार्च ते ८ एप्रिल २०२० या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मद्य विक्री आणि निर्मितीचे ४९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ३९ आरोपींना अटक केली आहे. तसेच मद्यवाहतूक करणारी दहा वाहने जप्त केली असून २४ लाख १९ हजार ४९५ इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु विक्री होणार नाही, यासाठी ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे अधीक्षक घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड