शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ठाणे जिल्हाभरात गावठी दारूच्या अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र, दारूसह २६ लाखांचा ऐवज नष्ट

By जितेंद्र कालेकर | Updated: June 23, 2024 19:38 IST

Thane News: ठाणे जिल्हयातील समुद्राच्या खाडीतील तिवरांच्या झुडूपामध्ये चालणाऱ्या गावठी दारुच्या अड्डयांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व्यापक धाडसत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह १३० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

- जितेंद्र कालेकरठाणे - ठाणे जिल्हयातील समुद्राच्या खाडीतील तिवरांच्या झुडूपामध्ये चालणाऱ्या गावठी दारुच्या अड्डयांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व्यापक धाडसत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह १३० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यामध्ये गावठी दारुसह २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

हातभट्टी दारुचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे जिल्हाभरात २२ जून २०२४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सूर्यवंशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे आणि उपअधीक्षक डॉ. वैभव वैद्य यांच्या नियंत्रणाखाली १३० अधिकारी कर्मचारी यांची विविध पथके तयार केली हाेती. याच पथकांमध्ये डॉ. सूर्यवंशी यांनी स्वत: सक्रीय सहभाग घेतला. अलिमघर, दिवा, खर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गाव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापूर, कुंभालीर् या ठाणे तसेच रायगड जिल्हयात हातभट्टी निर्माण करणाऱ्या गावांमधील निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून ती उद्धवस्त केली.

या कारवाई दरम्यान मुंबई, ठाण्यातील भरारी पथकांसह सात विविध पथकांची निर्मिती केली होती. ठाणे जिल्हयातील या कारवाईमध्ये २३ बेवारस तर एका वारसदार असलेल्या ठिकाणांसह २४ अड्डयांवर धाडसत्र झाले. यात २४ गुन्हे दाखल झाले असून ५९५ लीटर हातभट्टीची दारु आणि गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारे ६९ हजार २०० लीटर रसायन आणि इतर सामुग्री असा २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

आयुक्तांसह अधीक्षकांनी बोटींमधून केले धाडसत्र कोकण विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी तीन वेगवेगळया बोटींमधून धाडसत्र राबवूनअलिमघर, दिवा, अंजूर खाडीतील हातभट्टी निर्मितीची ठिकाणे उद्धवस्त केली. याच कारवाईमध्ये रायगड जिल्हयातील पथकानेही आठ गुन्हे नोंदवून चार लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. यातील फरार झालेल्या आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत तसेच आयपीसी कलम ३२८ आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी