- जितेंद्र कालेकरठाणे - किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाकडून याठिकाणी मेळावा घेण्यात येत होता. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. खासदार राजन विचारे हेही यावेळी उपस्थित होते.
ठाण्यात राडा! शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले, तणावाचे वातावरण
By जितेंद्र कालेकर | Updated: November 15, 2022 06:06 IST