शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली, नेमकं काय घडलं वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 16:02 IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे.

ठाणे-

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे. रेल्वे फाटकामुळे खारेगाव येथे वाहतुकीच्या त्रासाला गेली अनेक वर्ष नागरिकांना सामोरं जावं लागत होतं. आता रेल्व क्रॉसिंग टाळून रहिवाशांना थेट उड्डाणपुलावरुन प्रवास करता येणार आहे. पण या कामात श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती. 

उड्डाणपुलाचं लोकार्पण होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे काम पूर्णत्वास गेलं असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण व्हावं अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आज कार्यक्रम स्थळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद आव्हाड उपस्थित राहणार होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून 'जितेंद्र आव्हाड तुम आगे बढो'च्या घोषणा दिल्या जात होत्या. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू होती.

जितेंद्र आव्हाड गाडी घेऊन थेट पुलावर...राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुलाचं लोकर्पण होण्याआधीच उड्डाणपुलावर गेले होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी येताच ते थेट आपली गाडी घेऊन उड्डाणपुलावरच गेले आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते स्वत: पायी चालत कार्यक्रमस्थळी आले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर जितेंद्र आव्हाड यांनी चतुराईनं 'जितेंद्र आव्हाड आगे बढो'ऐवजी महाविकास आघाडीची घोषणा देण्याचं आवाहन केलं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणेत बदल करुन 'महाविकास आघाडीचा विजय असो' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. 

भर कार्यक्रमात टोलेबाजी अन् कोपरखळ्या...श्रेयवादाच्या लढाईमुळे कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आधीच जुंपलेली असताना नेत्यांनीही आपल्या भाषणात कोपरखळ्या आणि टोलेबाजी करत वातावरण चांगलंच गरम केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना कोविड नियमांची आठवण उपस्थितांना करुन दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील पालन करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.२००० सालापासूनच खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पहिला प्रस्ताव देण्यात आला होता असं सांगत राष्ट्रवादीच्या श्रेयवादाची हवाच शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी काढली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघाला २ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला अशी कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मारली. मग जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या रोखठोक शैलीत फटकेबाजी केली. "२००९ साली मी आमदार झालो. मात्र, विकास कामांसाठी कधीही निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. २००९ नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेले विकास कामे यातून फरक दिसून येईल. भास्कर नगर मधील रस्त्यासाठी विधानसभेत मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देत येणार नसल्याचे सांगितले. २० वर्षानंतर हा रस्ता झाला. महापौरांनी मिशन कळवा, असे संबोधले मात्र, त्यांचे मिशन कळवा काय हे समजलं नाही. जयवंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करतील अशी सूचना केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका", असा टोला आव्हाड यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंनी चतुराईनं वातावरण निवळतं केलं..."उड्डाण पुलाच्या कामात जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मोलाची. मात्र हा प्रकल्प होताना आलेल्या अडचणींचा व ते किती गरजेचे आहे, त्याचे गांभीर्य काय याबाबत रेल्वे प्रशासनाकडे श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. शिंदे आणि आव्हाड आमच्यात दोघांमध्ये दोस्ती आहे. आम्ही कधी एकमेकांविषयी मनात द्वेष ठेवत नाही. ते निवडणुकांच्या काळात ते त्यांच्या पक्षाची भूमिका आणि मी माझ्या पक्षाची भूमिका बजावत असतो. माझ्या मतदार संघातील विकास कमांचे आकडे आणि तुमच्या मतरदार संघातील काम बघा. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे नाव स्टेडीयमला देण्यासाठी लगेच सहमती दर्शवली. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यासाठी एकमताने लढा दिला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच मिशन कळवा नंतर तुम्ही लगेच मिशन वागळे याचा उल्लेख केला. त्यानंतर शिंदे यांनी तुम्ही देखील मिशन वागळे राबवा मी तुम्हाला रोखणार नाही. मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांनी चिंता करू नये महाविकास आघाडी होणार आहे. आम्ही कधी कमिशनचा विचार न केला लोकांचे काम केले, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना