शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

बिल्डरहितासाठी जि.प.ची कन्याशाळा बंद करण्याचा डाव, बी.जे. हायस्कूलचा ठाणे मनपात समायोजनेचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:12 AM

- सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्या शाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट करून घ्यायचे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात या ...

- सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्याशाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट करून घ्यायचे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात या दोन्ही शाळा असून त्यांच्या जमिनीला आज कोट्यवधींची किंमत आहे. या कोट्यवधींच्या जमिनीवर डोळा ठेवून खासगीकरणाचा आधार घेऊन ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा काही राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा डाव असून त्यासाठीच अत्यल्प पटसंख्येच्या नावाखाली कन्याशाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे महापालिका शाळेत समायोजन करण्याचे घाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या बी.जे. हायस्कूलच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून ती काही वर्षांपासून कन्याशाळेच्या वास्तूत भरते. सकाळी भरणाºया या बी.जे. हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण, प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्याशाळा दुपारच्या सत्रात भरते. तिच्या पटावर ६६ विद्यार्थिनी आहेत. मात्र, केवळ ३० ते ३८ विद्यार्थिनींची वर्गात रोजची उपस्थिती असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत. पण, दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे ७० च्या जवळपास आहे. या दोन्ही शाळांत अल्प विद्यार्थी संख्या आहे. यामुळे कन्याशाळा बी.जे. हायस्कूलमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर, हे बी.जे. हायस्कूल बांधलेल्या नवीन इमारतीत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.या हालचालींसंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा तसा जीआर आहे. त्यास अनुसरून या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. जूनपर्यंत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बढे म्हणाले. कन्याशाळेची इमारतही ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती आता धोकादायक झाली. या शाळेचा वरचा मजला आधीच पाडून इमारतीचा भार कमी केला आहे. धोकादायक नसलेल्या वर्गखोल्यांत दोन्ही हायस्कूल दोन सत्रांत वास्तूमध्ये सुरू आहे.जि.प.ला शहरातील शाळा डिजिटल करता आल्या नाहीतइमारत जीर्ण झाल्यामुळे कन्याशाळेची वास्तू पाडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यानंतर, त्यावर काय बांधणार, यावर मात्र प्रशासनाकडून काहीच सांगितले जात नाही. ग्रामीण भागातील एक हजार ३६३ शाळा डिजिटल केल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेचे मात्र शहरातील या दोन हायस्कूलकडे दुर्लक्ष झाले.यामुळे येथील विद्यार्थी संख्या रोडावली. शहरातील अन्य शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. ग्रामीणमधील १० शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंदही कराव्या लागल्या.मात्र, ही नामुश्की पचवण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९५० शाळा प्रगत केल्याचा दावा आहे. परंतु, जिल्हा परिषद इमारतीला लागून असलेल्या कन्याशाळा प्रगतही करता आली नाही आणि विद्यार्थी संख्याही जिल्हा परिषदेला वाढवता आलेली नाही.कन्याशाळेच्या केवळ भूखंडाच्या श्रीखंडावर लक्षब्रिटिशकालीन असलेल्या या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज होती व आहे. पण, केवळ महिला व मुलींचे सबलीकरण करण्याच्या घोषणा करणाºया प्रशासनाला गरीब, दीनदलितांच्या मुलींच्या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारता आला नाही. भले मोठे प्रांगण असलेल्या या शाळेला सुसज्ज करता आले नाहे.‘बेटी पढाव और बेटी बचाव’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद शहरातील या कन्याशाळेलाडिजिटल करू शकली नाही. शहराच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणच्या या शाळेच्या भूखंडावर लक्ष केंद्रित करून आगामी सहा महिन्यांत ही कन्याशाळा तोडण्याचे प्रयत्न आहेत.यामुळे शहरातील हक्काच्या शाळेपासून या सावित्रीच्या लेकी वंचित होतील. त्यांना हक्काचे शिक्षण महागड्या शाळेत घेणे शक्य होणार नसल्याने त्यांच्या पालकांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे