शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:03 IST

लसीकरण मोहीमेला मागील काही दिवसापासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने घेतले महत्त्वाचे निर्णय.

ठाणे : लसीकरण मोहीमेला मागील काही दिवसापासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या  रुग्णांच्या नातेवाईकांना लस प्रमाणपत्र दाखवूनच केसपेपर देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. तर ज्या पालिका कर्मचारी, अधिकारी, हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर आदींना देखील आता लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन थांबविले जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हर घर दस्तक ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार पालिकेचे कर्मचारी, आशा वर्कर, वॉर्ड बॉय आदींसह डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन घरोघरी जाऊन लसीकरणाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी १६७ पथके तयार केली जाणार आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना तत्काळ त्याच ठिकाणी लस दिली जाणार आहे. याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनादेखील अद्यापही लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नसेल त्यांनी आठ दिवसात डोस घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन थांबविले जाणार असून यासाठी ८ दिवसांचा कालावधी त्यांना दिला जाणार आहे.

याशिवाय पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अॅन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. परंतु यापुढे जाऊन आता लस घेतल्याचे प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्याला किंवा त्याच्या नातेवाईंकांना केस पेपर दिला जाणार नसल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु या निर्णयावरुन टीका होऊ शकते, त्यामुळे हा निर्णय विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.याशिवाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी देखील लसीकरण करुन घ्यावे यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेबरोबरच बैठक घेऊन त्यांना देखील लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत देखील नागरीकांना लसीकरणासाठी आवाहन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५ लाख ३५ हजार नागरीकांनी अद्याप पहिला डोसही घेतला नाही ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या लसीकरणात आतार्पयत ११ लाख ७४ हजार ९९० नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ६९ टक्के एवढे असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही ६ लाख ७५ हजार ७५३ एवढी आहे. त्यानुसार अद्यापही ४ लाख ९९ हजार २३७ नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. परंतु असे असले तरी अद्यापही तब्बल ५ लाख ३५ हजार नागरीकांनी एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंब्रा, राबोडीतही केली जाणार जनजागृती ठाणे शहरात लसीकरण मोहीम सुरु असली तरी देखील मुस्लीम बहुल वस्तीमध्ये अद्यापही लसीकरण मोहीमेला हवा तसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. त्यामुळे आता मुंब्रा, राबोडी किंवा अन्य मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या