शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सुरांच्या मैफिलीने पार पडला ठाणे ग्रामीण पोलिसांचा दिवाळी स्रेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ...

ठळक मुद्दे मराठी हिंदी सिने कलाकारांची हजेरी डॉ. शिवाजी राठोड यांनी गायिली महंमद रफिंची गाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या संकल्पनेतूल दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हिंदी मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये डॉ. राठोड यांनीही महंमद रफींची गाणी गाऊन पोेलीस कुटूंबियांची दाद मिळविली.घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘कोर्ट यार्ड’ हॉटेलच्या सभागृहात रंगलेल्या या बहारदार कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कर्तव्याचा भाग म्हणून पोलीस दलावर गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सलग व्यस्त बंदोबस्ताचे सण लागोपाठ येतात. त्यामुळेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कुटूंबांसमवेत असे सण साजरे करता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर

ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी दिवाळी स्रेहमिलन २०१८ या कार्यक्रमाचे १४ नोव्हेंबर रोजी रात्री आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ठाणे ग्रामीण पोलीस दलाची धुरा ज्यांच्या हाती आहे, त्या अधीक्षक डॉ. राठोड यांनी स्वत: रफींच्या आवाजातील गाणी गाऊन कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. ‘ओ मेरे मितवा’, ‘आनेसे उसके आये बहार’, ‘छुप गये सारे नजारे’ या गीतांबरोबरच ‘प्रितीचं झुळ झुळ पाणी’, ‘चोरीचा मामला’ या मराठी गाण्यांना प्रेक्षकांची त्यांना चांगलीच दाद मिळाली. या कार्यक्रमाला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील तसेच ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिने कलाकार मुकेश खन्ना, स्वप्नील जोशी, महिमा चौधरी, रविकिशन , मानसी नाईक तसेच ‘साज’ या आॅर्केस्ट्राच्या कलाकारांनी स्वर संगीताने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम मंत्रमुग्ध केला.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcultureसांस्कृतिक