शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे मुरबाड, भार्इंदरमध्ये धाडसत्र: दीड लाखांची गावठी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 20:19 IST

कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्चभूमीवर देशी विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारु विक्री आणि निर्मितीला बंदी आहे. असे असूनही मुरबाडच्या उचले गावच्या परिसरातील जंगल टेकडी भागात गावठी दारुची निर्मिती तर भार्इंदर भागातून विक्री सुरु होती. या दोन्ही ठिकाणी धाड टाकून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये दीड लाखांची गावठी दारु जप्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारु विक्री आणि निर्मितीला बंदीमुरबाडमधून एकाला तर भार्इंदरमधून दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरबाड येथील धाडीत गावठी दारुसह एक लाखांचा ऐवज जप्त केला. तर भार्इंदर येथील धाडीत रविवारी गावठी दारुसह ५० हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आली आहे.कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्चभूमीवर देशी विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारु विक्री आणि निर्मितीला बंदी आहे. असे असूनही मुरबाडच्या उचले गावच्या परिसरातील जंगल टेकडी भागात गावठी दारुची निर्मिती होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस हवालदार महादेव खोमणे यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी उचले गावातील जंगल टेकडी भागातील ओहळाच्या जागेतील गावठी दारुच्या अड्डयावर धाड टाकली. या धाडीत गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे पत्र्याचे दोन मोठे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे प्रत्येकी १७५ लीटर नवसागर मिश्रित गुळ आणि मोहाची फुले असलेले सात प्लास्टीकचे ड्रम आणि ३५ लीटर गावठी दारु असा एक लाख ९७५ रुपयांचा मुद्देमाल याठिकाणी जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये योगेश गडगे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात महाराष्टÑ प्रोव्हीशन अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूसऱ्या घटनेत मोरवा भाट, भार्इंदर पश्चिम खाडीच्या किनारी मिठागरातून गावठी दारुची विक्रीसाठी वाहतूक करणा-या विक्रांत राऊत (२१, रिक्षा चालक, रा. मोरवा गाव, भार्इंदर) आणि सुमित सिंग (२८, रा. राईगाव, भार्इंदर) या दोघांना १२ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लीटरच्या ३२प्लास्टीकच्या पिशव्या त्यामध्ये ४८ हजारांची ४८० लीटर गावठी दारु जप्त केली आहे. त्यांच्याविरुद्ध भार्इंदर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथ रोग प्रतिबंधक कायदा तसेच दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी