शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Thane: घोडबंदरसाठी २५०, भाईंदरसाठी ६०० रुपये, रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे वसुली; मीटर रिक्षा स्टँडपर्यंत प्रवाशाला पोहोचू देत नाहीत

By जितेंद्र कालेकर | Updated: September 1, 2024 12:43 IST

Thane News: शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ... ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी... हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच हे रिक्षाचालक त्यांच्या दिशेने येतात. घोडबंदर रोड पातलीपाडासाठी २५० रुपये, तर भाईदरकरिता थेट ६०० रुपये असे ओरडत असतात.

 - जितेंद्र कालेकर ठाणे - शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ... ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी... हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच हे रिक्षाचालक त्यांच्या दिशेने येतात. घोडबंदर रोड पातलीपाडासाठी २५० रुपये, तर भाईदरकरिता थेट ६०० रुपये असे ओरडत असतात. वंदना सिनेमा एसटी बस स्टँड या भाड्यासाठी ५० रुपये सांगतात. रामप्रहरी रेल्वे प्रवाशांची ठाणे स्थानकात उतरल्यावर होणारी लूटमार प्रतिनिधीला पाहायला मिळाली. ठाणे रेल्वेस्थानकातून मुंबईकडे येणाऱ्या (अप) १०५ आणि मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या (डाऊन) रेल्वे गाड्यांची संख्या तितकीच १०५ आहे. पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जाताना ठाण्यात थांबणाऱ्या गाड्यांची संख्या ३० ते ४० इतकी आहे.

अशी होते रिक्षाचालकांकडून लूट- ठाणे ते घोडबंदर रोडवरील पातलीपाड्यासाठी १ रिक्षाचालक थेट २५० रुपये होतील, असे सांगतात. प्रत्यक्षात हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या ठिकाणी मीटरप्रमाणे १२५ ते १३० रुपये होतात. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सुमारे १८० ते २०० इतके भाडे होते; मात्र रिक्षाचालक ठोक २५० रुपये वसूल करतात.- ठाणे स्टेशन ते भाईंदरसाठी थेट ६०० रुपये वसूल केले २ जातात. भाईदरपर्यंत मीटरने गेले तर ४०० रुपये होतात. वंदना सिनेमा एसटी स्टॅन्डसाठी ५० रुपये मागितले जातात. या अंतराकरिता ३० रुपये भाडे आहे.

रिक्षाचालकांची अक्षरशः 'भाईगिरी' असतेपहाटे ३ वाजून १० मिनिटांनी पहिली कोणार्क एक्स्प्रेस ही भुवनेश्वर-मुंबई रेल्वे ठाण्यात थांबते. तेव्हापासून ८ वाजेपर्यंत रिक्षाचालकांची मनमानी सुरू असते. मुंबईच्या दिशेकडे असलेल्या प्रवेशद्वारासमोर आणि कल्याण बाजूकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांची अक्षरशः 'भाईगिरी' सुरु असते. त्यावेळी ना वाहतूक शाखेचा पोलिस असतो ना प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कर्मचारी तिथे असतो.

 भल्या पहाटेपासून अनेक ट्रेनमधून शेकडो प्रवासी ठाण्यात उतरतात. काही वेळा परदेशी नागरिकांचाही यात समावेश असतो. प्रवाशांना महत्त्वाच्या ठिकाणांसह रिक्षा आणि टॅक्सीचे योग्य दर माहिती होण्यासाठी अधिकृत फलक लागले पाहिजे. आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि वाहतूक पोलिसांची पथकेही तैनात केली पाहिजेत.- अवधेश कुमार, सहायक स्टेशन मास्तर, ठाणे रेल्वे स्टेशन.

कोणीही रिक्षाचालक जादा भाडे आकारणी करीत असेल तर त्यांच्यावर नियमित कारवाई केली जाते. ठाणे स्टेशनजवळील या प्रकाराचीही माहिती घेऊन त्याठिकाणी विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल. - पंकज शिरसाठ(पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर) 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस