शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चाकूच्या धाकावर दुकानातून मोबाइलची जबरी चोरी करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:59 IST

मुक्ताईनगर भागातील एका दुकानात तोडफोड करीत चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या हर्षल राम मोहिते (२४) या सराईत गुन्हेगाराला शनिवारी राबोडी पोलिसांनी अटक केली. हर्षल याच्याविरुद्ध खूनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे राबोडी पोलिसांची कामगिरीचाकूसह मोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: माजीवडा येथील मुक्ताईनगर भागातील एका दुकानात तोडफोड करीत चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाºया हर्षल राम मोहिते (२४) या सराईत गुन्हेगाराला शनिवारी राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जबरी चोरीतील मोबाइल आणि चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.मुक्ताईनगर परिसरातील रहिवाशी सतीश वाघधरे (२६) यांच्या दुकानात २५ सप्टेबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरातील हर्षल मोहिते याने शिरकाव केला होता. त्याने दुकानाची तोडफोड करून चाकूचा धाक दाखवित ठार मारण्याची धमकी देत वाघधरे यांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक केशव धापशी आणि पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खडसरे आदींच्या पथकाने मिळालेल्या वर्णनाच्या आधारे हर्षल या सराईत गुन्हेगाराला २६ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. हर्षल याच्याविरुद्ध खूनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी