शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?

By धीरज परब | Updated: December 29, 2025 12:55 IST

महापालिका निवडणुकीतही भाजपा आणि शिंदेसेनेतील धुसफूस कायम आहे. भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपाकडून शिंदेसेनेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसत आहे. 

-धीरज परब, मीरारोड महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असेलेली ठाणे महापालिका आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत दोंघांनी युतीत लढण्याची तयारी जवळपास निश्चित केली आहे. परंतु स्वतःचे बालेकिल्ले राखताना शिंदे यांनी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई मात्र वाऱ्यावर सोडले आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून शिंदेसेनेला युतीच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याची माहिती आहे. 

ठाणे जिल्हा हा शिंदेसेनेचा अर्थात एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा बालेकिल्ला म्हणून महापालिका निवडणुकीत भक्कम करतील अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी व  लोकप्रतिनिधींना होती. शिवाय महापालिकांशी संबंधित नगरविकास खाते देखील शिंदे यांच्याकडेच आहे. 

भाजपासमोर शिंदेसेनेची शरणागती?

राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी महापालिकांमध्ये भाजपासोबत युती होत असताना ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा या महापालिकांमध्ये मात्र शिंदेसेनेने भाजपासमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे. 

ठाणे महापालिका ही शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहेच, तेवढीच प्रतिष्ठा त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत लागलेली आहे. कडोंम हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होमपीच आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि चव्हाण यांनी एकमेकांशी जुळवून घेत युती करण्यावर भर दिला आहे. 

भाजपा-शिंदेसेना किती जागा लढवणार?

त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेत १३१ पैकी शिंदेसेना ९१ तर भाजपा ४० अशी वाटपाची चर्चा आहे. पूर्वी या महापालिकेत शिवसेनेच्या ६७, तर भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. 

कल्याण डोंबिवलीमध्ये देखील शिंदेसेना ६४, तर भाजपा ५८ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये युती केल्याने शिंदेसेना आणि भाजपा दोघांचाही फायदा होण्याचे वरिष्ठांचे अंदाज आहेत. 

मीरा भाईंदर, नवी मुंबईत काय?

मीरा भाईंदरमध्ये ९५ पैकी २०१७ साली भाजपा ६१ आणि शिवसेना २२ जागी जिंकली होती. त्यातही मागच्या ६ वर्षात शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शहरात शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. परंतु या ठिकाणी भाजपाकडून सेनेला केवळ १३ जागा देऊ केल्या व त्यादेखील भाजपाच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही असे हिणवले गेले.

दुसरीकडे नवी मुंबईत देखील मंत्री गणेश नाईक यांनी आपणच नवी मुंबईचे विकासकर्ते असल्याने १११ पैकी भाजपासाठी ९१ तर शिंदेसेनेला केवळ २० जागा देऊ केल्याची चर्चा आहे. 

नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेत शिंदेसेनेची ताकद वाढवण्याची संधी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. भाजपासोबत ठाणे व कल्याण-डोंबिवलीमध्ये युती केली तशीच युती नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये व्हावी, अशी भूमिका शिंदेसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून घेतली गेली होती. 

स्वतः उमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे म्हटले होते. 

दोन महापालिकांमध्ये शिंदेसेनेला हद्दपार करण्याची खेळी?

राजकीय फायद्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत युती होणार तर दुसरीकडे मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये मात्र भाजपाने शिंदेसेनेला  पुरते नमवून ठेवले आहे. भाजपाचे बळ जास्त असल्याने तेथे शिंदेसेनेला मोजक्या जागा देण्याची तयारी दर्शवत युती होणारच नाही, अशी खेळी भाजपाने खेळली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपा युती न करता स्वबळावर लढून शिंदेसेनेला पालिकेतून हद्दपार करण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. 

उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच भाजपाने कोंडी केली? की शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वतःचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी नवी मुंबई व मीरा भाईंदरमध्ये युतीसाठी फारसे वजन वापरणे टाळले? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Politics: Shinde, Chavan unite for Thane, Kalyan-Dombivli; what about others?

Web Summary : Shinde and Chavan prioritize Thane and Kalyan-Dombivli alliances. Mira-Bhayandar and Navi Mumbai are sidelined, with BJP dominating seat allocations. Shinde's influence is questioned as BJP aims to control these corporations, potentially sidelining Shinde's Sena.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६