शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

ठाणे पोलिसांनी उतरवली २,१४३ तळीरामांची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:15 IST

‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्दे८० अधिकाऱ्यांचा सहभाग२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी चालकांवर खटले१८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवरठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षी मात्र केवळ एका दिवसांत दोन हजार ७१ तळीरामांवर कारवाई झाली होती.थर्टी फर्स्ट साजरी करण्याच्या धुंदीत अनेक तळीराम हे बेदरकारपणे वाहन चालवितात. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भन्नाट वेगाने जाणाºया वाहनांच्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. तर, अनेकांना गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्वही येते. सर्वाेच्च न्यायालयानेही किमान १० टक्के रस्ते अपघात कमी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी २९ ते ३१ डिसेंबर २०१९ तसेच १ जानेवारी २०२० च्या पहाटेपर्यंत राबविलेल्या विशेष मोहिमेत १८ युनिटमार्फत मोक्याच्या नाक्यांवर ही कारवाई केली.* ५४ श्वासविश्लेषक यंत्रांचा वापर२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार खटले भरण्यात आले. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण या विभागात वाहतूक उपशाखेने ही मोहीम राबविली. यासाठी ५४ श्वासविश्लेषक (ब्रिथ अ‍ॅनालायझर) यंत्रांचाही वापर केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.*येथे होती नाकाबंदीपोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या अधिपत्याखाली चार उपविभागांतील सुमारे ८० अधिकाºयांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. ठाण्यातील नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, कासारवडवली, कापूरबावडी, राबोडी आणि वागळे इस्टेट या युनिटच्या तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, आनंद नगरनाका, कोपरी, माजिवडा जंक्शन, गोल्डन डाइजनाका आदी ठिकाणीही तपासणी झाली. तर, कल्याण उपविभागातील कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी या युनिटमधील महामार्ग, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, दूधनाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागांत अनेक वाहनाचालकांना पकडण्यात आले. तसेच भिवंडीतील वंजारपट्टीनाका, धामणकरनाका आणि शिवाजी चौक या भिवंडी, नारपोली आणि कोनगाव युनिटच्या कारवाईतही पोलिसांनी अनेकांची झिंग उतरविली. उल्हासनगरासह विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांत नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांना पकडले.*मद्यपींची पोलिसांशी हुज्जतचारही विभागांतील ९० मुख्य नाक्यांवर ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ ते १ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांनी किती प्रमाणात अल्कोहोल घेतले, याची चाचपणी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांशी मद्यधुंद वाहनचालकांनी हुज्जत घालून कारवाईत अडथळे आणण्याचेही प्रकार केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह