शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

ठाणे पोलिसांनी ११६ जणांवर केली तडीपारीची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: November 19, 2024 20:12 IST

चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचा बडगा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे पोलिसांनी जशी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे, त्याप्रमाणे दहशत माजविणाऱ्या स्थानिक गुंडांवरही तडीपारीची कारवाई केली आहे. संपूर्ण ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातून गेल्या महिनाभरात ११६ गुंडांवर तडीपारीची तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलमानुसार चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी मंगळवारी दिली.

निवडणूकीसाठीची मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील ३५ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्याखाली सहा जणांना बाहेरील जिल्हयातील कारागृहात स्थानबद्ध केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२४ कलम १२६, १२८ आणि १२९ नुसार चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

महाराष्ट्र पोलिस अधिनियमाखाली ५५, ५६ आणि ५७ नुसार ११६ गुंडांना ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्हयातून हद्दपारीची कारवाई केली. तर बेकायदेशीर दारु तस्करी करणाऱ्या १६१ जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ अन्वये कारवाई केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी