शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येच्या प्रयत्नातील वृद्धेचे ठाणे पोलिसांनी वाचविले प्राण

By जितेंद्र कालेकर | Updated: November 8, 2021 23:56 IST

पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील काही महिलांची मदत घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचाºयांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

ठळक मुद्देतिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्नअवघ्या तीन मिनिटांमध्ये घेतली धाव :

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कौटुंबिक कलहामुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या वैशाली ढोळ (६५) या वृद्धेचे मन परिवर्तन करण्यात नौपाडा पोलिसांना सोमवारी यश आले. पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेतल्याने तिचे प्राण वाचू शकल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बीट मार्शल एक आणि दोनचे पोलीस नाईक सूरज कोटकर, जानराव तायडे, ईश्वर घोलवड आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव हे सोमवारी सकाळी गस्त घालीत होते. त्याचवेळी बीट मार्शल दोन यांच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर सकाळी ७.२३ मिनिटांनी वैशाली ढोळ ही महिला आत्महत्या करीत असल्याचा कॉल कचराळी तलावाच्या बाजूला असलेल्या ‘पूर्वा’ या सोसायटीतून प्राप्त झाला. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता बिट मार्शल एक आणि दोन यांनी या कॉलची तत्काळ दखल घेऊन अवघ्या तीन मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेतली. आपल्याच सदनिकेतून खाली उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेली ही महिला तिच्याच सदनिकेच्या खिडकीत अडकली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील काही महिलांची मदत घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचाºयांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी