शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून अपहरण झालेल्या बाळाची नाशिक येथून सुखरुप सुटका: ठाणे पोलिसांनी केली महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:13 IST

लग्नाला दहा वर्ष होऊनही मुलबाळ नसल्याने नाशिकच्या नीलम बोरा या महिलेने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल या रेल्वे स्थानकातून एका दोन महिन्यांच्या बाळाची चोरी केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने या प्रकरणाचा छडा लावून बाळाची तिच्या तावडीतून सुटका केली असून तिला अटक केले आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईसीसीटीव्हीच्या आधारे केला तपासमुलबाळ नसल्याने उचलले चोरीचे पाऊल

ठाणे: मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल या रेल्वे स्थानकातून दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम संजय बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. तिच्या तावडीतून या बाळाची सुखरुप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली.मुंब्रा येथील सलमान खान या दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा तपास ठाणे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सलमानचे अपहरण करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याच अपहरणाचा तपास मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पथक करीत असतांना मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसटी) आणि सीएसटी ते कसारा आणि कर्जत पर्यंतच्या सर्व सीसीटीव्हींची पोलिसांनी पडताळणी केली.मार्च महिन्याच्या अखेरीस सीएसटी येथून दोन महिन्यांच्या बाळाला उचलून नेणारी एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सलमानच्या तपासाला यातूनच वेग मिळाला. सलमानला उचलून नेणाºया महिलेची देहयष्टी सीएसटीमधून बाळ चोरणाºया महिलेशी मिळतीजुळती होती. त्यामुळेच ही महिला आणि मुंब्रा येथून सलमानचे अपहरण करणारी महिला एकच असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला या महिलेचे सीसीटीव्हीतील छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वेगवेगळया ठिकाणी प्रसिद्ध महिलेची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच दादर ते आसनगाव, कल्याण ते कर्जतपर्यंत सुमारे २०० हून अधिक सीसीटीव्हींचीही पडताळणी करुन या महिलेचा कसून शोध घेण्यात आला. या प्रकरणाचा शोध सुरु असतांना संबंधित संशयित महिला रामवाडी, पंचवटी भागातील असल्याचे समोर आले. या माहितीची खातरजाम झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, अविनाश कु-हाडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, सुनिल जाधव, दादा पाटील, विकी कांबळे आणि नीलम वाकचौरे आदींच्या पथकाने १४ एप्रिल रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास नाशिकमधील पंचवटीतील रामवाडी येथील श्रद्धा पार्क येथून ताब्यात घेतले. तिच्याच ताब्यातून मुंबईतून अपहरण झालेल्या दोन महिन्यांच्या बाळाचीही या पथकाने सुखरुप सुटका केली. नीलम बोरा या महिलेने २९ मार्च २०१९ या बाळाचे सीएसटी येथून अपहरण केल्याची कबूलीही दिली. दहा वर्ष लग्नाला होऊनही स्वत:ला अपत्य नसल्याने आपण या बाळाची चोरी केल्याची कबूलीही तिने तपास पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाळाला आता देवराज यांनी तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. बाळाची प्रकृती सुखरूप असून त्याला सोमवारी आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर अपहरण करणा-या नीलम बोरा या महिलेला पुढील कारवाईसाठी सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण