शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातून अपहरण झालेल्या मुलीची सोलापूरातून सुटका: ठाणे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:52 IST

मुंब्य्रातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या अमिषाने सोलापूरमध्ये आपल्या मुळ गावी पळवून नेणाऱ्या सुरज कसबेला ठाणे गुन्हे शाखा आणि सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईने सोलापूरातून अटक केली आहे. या मुलीचीही त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केली.

ठळक मुद्देअवघ्या ३० तासांमध्ये लावला छडाअपहरणकर्त्यास अटकलग्नाचे अमिष दाखवून नेले पळवून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नाचे अमिष दाखवून मुंब्य्रातून एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करणा-या सुरज कसबे (२३, रा. मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने सोलापूरातून अवघ्या ३० तासांमध्ये गुरुवारी अटक केली. या मुलीला शुक्रवारी सुखरुप तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार १० आॅक्टोंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केली होती. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडेही समांतर तपास दिला होता. या मुलीला सुरज (मुळ रा. कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने सोलापूर येथे पळवून नेले असून तो तिच्यासह त्याच्या गावी गेल्याची टीप सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक माने, पोलीस नाईक संजय बाबर, भगवान हिवरे या पथकाने सोलापूरातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, जमादार आबा शिंदे आणि हवालदार जाधव यांच्या मदतीने कोरफळे गावातून ११ आॅक्टोंबर रोजी रात्री १० वा. च्या सुमारास सुरजला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. त्याला शुक्रवारी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण