शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पकडलेल्या सोनसाखळी चोरट्यांकडून ठाणे पोलिसांची दिशाभूल: विसंगत माहितीमुळे तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:08 IST

ठाण्याच्या नोपाडा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या कुख्यात सोनसाखळी चोरटयांनी दुस-या दिवशीही तोंड उघडले नाही. त्यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे तपास पथकाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देभिवंडीच्या इराणी वस्तीवर छापा टाकून पकडलेअनेक गुन्हयांची उकल होण्याची शक्यताइराणी वस्तीतूनही झाला होता विरोध

ठाणे : भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ताब्यात घेतलेल्या तीन इराणी चोरट्यांनी अजूनही तोंड उघडलेले नाही. वेगवेगळी उत्तरे देऊन तपास पथकाची ते चांगलीच दिशाभूल करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे, मुंबई परिसरात महिलांची मंगळसूत्र तसेच सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पलायन करणाºया एका २४ वर्षीय ‘टॉप २०’ मधील कुख्यात गुंडासह इराणी टोळीतील या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. दोन दिवस सापळा लावल्यानंतर हे टोळके पळून जाण्याच्या बेतात असतांनाच निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत ओऊळकर, तसेच २५ ते ३० जणांच्या पथकाने भिवंडीच्या इराणी वस्तीमध्ये शिरून या चोरट्यांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या तिघांनाही ताब्यात घेतेवेळी इराणी वस्तीतील त्यांच्या कुटूंबियांनी पोलीस पथकाला कडवा विरोध केला होता. मोठा जमावही त्याठिकाणी जमा झाला होता. महिलांना हिसका देऊन मंगळसूत्र किंवा त्यांची सोनसाखळी हिसकावण्यात माहिर असलेले हे टोळके पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यातही चांगलेच तरबेज आहे. त्यामुळेच ते आता वेगवेगळी उत्तरे देऊन तपास पथकाची दिशाभूल करीत आहेत. सोनसाखळी हिसकावल्याची कबुली देतांनाच पुन्हा त्याच बाबीची विसंगत माहिती ते देत असल्यामुळे त्यांनी चोरलेल्या मुद्देमालाची माहिती काढणे, तो त्यांच्याकडून हस्तगत करणे ही तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमधील एखादी जरी कडी जुळली तरी अनेक बाबी उघड होऊ शकतात. त्यातून अनेक गुन्हे उघड होऊन त्यांच्या साथीदारांचीही माहिती मिळू शकते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवलेल्या किंवा विक्री केलेल्या मालाची माहिती मिळू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले. सध्या तरी त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्यामुळे त्यांना अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा