शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

ठाणे पोलिसांनी थकविले टीएमटीचे ८ कोटी १९ लाख

By admin | Updated: March 2, 2016 01:51 IST

आधीच तोट्यात असलेल्या ठाणे परिवहन सेवेला विविध समस्यांच्या गर्तेतून जात असतांनाच आता ठाणे पोलिसांनीदेखील परिवहनचे आठ वर्षांचे ८ कोटी १९ लाख थकविल्याची बाब समोर आली

ठाणे : आधीच तोट्यात असलेल्या ठाणे परिवहन सेवेला विविध समस्यांच्या गर्तेतून जात असतांनाच आता ठाणे पोलिसांनीदेखील परिवहनचे आठ वर्षांचे ८ कोटी १९ लाख थकविल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात परिवहनने वारंवार पाठपुरावा करुनदेखील पोलिसांनी अद्यापही ही थकबाकी भरली नसल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात ही बाब नमूद केली आहे. ठाणे परिवहन सेवेत आजघडीला ३१३ बस असून त्यातील १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनचे प्रवासी इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबर खाजगी बसने पळविल्याने परिवहनचे दररोजचे उत्पन्न सुद्धा २६ लाखांवरून २३ लाखांवर आले आहे. त्यात वेतन थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी आधी उत्पन्न वाढवा मगच तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, असा सल्ला दिला आहे. परंतु, दुसरीकडे परिवहनला विविध बाबींकडून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ठाणे पोलिसांच्या थकबाकीचादेखील समावेश होतो. पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रवास खर्चापोटी पोलीस ग्रॅन्ट परिवहन सेवेकडे प्राप्त होत असते. २००७-०८ ते २०१५-१६ या कालावधीत ती ८ कोटी १९ लाख एवढी असून गृह खात्याकडून अद्याप ती प्राप्तच झाली नसल्याचे परिवहनने अंदाजपत्रकात नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मिळावी म्हणून परिवहन सेवेने गृह खात्याकडे वारंवांर पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. परंतु अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नसल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली. परंतु मार्च २०१६ पर्यंत या रकमेपैकी ५ कोटी ८१ लाख व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख परिवहन सेवेकडे प्राप्त होतील, असे अपेक्षित धरले आहे. मागील वर्षीदेखील ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा परिवहनला होती, परंतु ती अद्यापही मिळालेली नाही. (प्रतिनिधी)