शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांनी थकविले परिवहन सेवेचे २२ कोटी ८८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:29 IST

ठाणे परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडून मिळणारे २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी अद्यापही परिवहन सेवेने येणे शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देकेवळ ४ कोटी ८१ लाखांची देणी मिळालीआर्थिक वर्षात ४ कोटी १३ लाखांची देणी मिळण्याची आशा

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडुन मिळणारे ४.८१ कोटी पोलीस अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले आहे. परंतु आजच्या घडीला देखील पोलिस खात्याकडून २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी येणे शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.            ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाज पत्रकात ही बाब समोर आली आहे. ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३१३ बस असून त्यातील १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनचे प्रवासी इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबरोबर खाजगी बसने पळविले असले तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या आसपास गेले आहे.            परंतु दुसरीकडे परिवहनला विविध बाबींकडून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ठाणे पोलिसांच्या थकबाकीचा देखील समावेश होतो. पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रवास खर्चापोटी पोलीस ग्रॅन्ट परिवहन सेवेकडे प्राप्त होत असते. २०१०-११ ते २०१७-१८ या कालावधीत पोलीस ग्रन्ट ही २२ कोटी ८८ लाख एवढी असून ती पोलीस खात्याकडून अद्याप प्राप्तच झाली नसल्याची माहिती परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात नमुद केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मिळावी म्हणून परिवहन सेवेने पोलिस खात्याकडे वारंवांर पत्रव्यवहार सुध्दा केला आहे. परंतु अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नसल्याची माहिती परिवहन सुत्रांनी दिली आहे. परंतु मार्च २०१६ पर्यंत या रकमेपैकी ५ कोटी ८१ लाख व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख परिवहन सेवेकडे प्राप्त होतील असे अपेक्षित धरण्यात आले होते. त्यानंतर यंदा सादर झालेल्या परिवहनच्या मुळ अंदाज पत्रकात मार्च १९ पर्यंत या शिल्लक रकमेपैकी ३ वर्षांची ४ कोटी १३ लाख परिवहनला प्राप्त होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. यातील किती रक्कम परिवहनला प्राप्त झाली याचा उल्लेख झालेला नाही. मागील वर्षी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडुन मिळणारे ४.८१ कोटी पोलीस अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले आहे. परंतु आता तर २२ कोटी ८८ लाखांची देणी अद्यापही शिल्लक असून ती वसुल करण्यासाठी परिवहनला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाPoliceपोलिस