शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

गुजरातच्या सीमेवरून मोटारसायकल चोरटयाला ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:26 IST

ठाण्यातील मोटारसायकलींची चोरी करुन गुजरातमध्ये पसार झालेल्या शैलेश ऊर्फ सुजित रतनशी शाह या चोरटयाला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे५ मोटारसायकली जप्तहेल्मेट घालून बिनधास्तपणे करायचा चोरीदुचाकींसाठी गि-हाइकाच्या शोधात असतांना जेरबंद

ठाणे : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी उभी केलेल्या मोटारसायकलची रेकी करून नंतर हेल्मेट परिधान करून तिची चोरी करणाऱ्या शैलेश ऊर्फ सुजित रतनशी शाह (२२, रा. चरई, ठाणे) या अट्टल चोरट्यास गुजरातच्या सीमेवरून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.ठाणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तसेच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच अनुषंगाने ठाणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने शैलेश याला गुजरातमधील उमरगा भागातील सोलसुंबा गावातून २८ जून २०१९ रोजी ताब्यात घेतले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची पक्की खबर नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक प्रसाद निकुंभ, हरीश तावडे, गोविंद पाटील, भागवत थाविल आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने त्याला अटक केली. दुचाकीची चोरी केल्यानंतर हेल्मेट घालून तो पळून जायचा. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय येत नव्हता. त्याने याआधी ठाणे शहर आणि नवी मुंबई परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत. नवी मुंबई पोलिसांनीही केली होती यापूर्वी अटकनौपाड्यातील दोन, बदलापूर, उल्हासनगर आणि शिवाजीनगर या भागातून प्रत्येकी एक अशा पाच मोटारसायकल चोरीची कबुली त्याने दिली असून या पाचही दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. यापूर्वी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानेही त्याला अटक केली होती. त्यावेळीही पाच ते सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघड झाले होते. त्याच्याकडे असलेल्या पाच चोरीच्या मोटारसायकली तो अल्प किमतीमध्ये विक्री करण्याच्या तयारीत असतांनाच नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून त्याच्याकडून आणखीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी