शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ठाणे-पालघरचे दोन हजार खटले निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:36 IST

विविध प्रकरणांत दाखल होणारे आणि प्रलंबित (जुने) असलेले अशा ३२ हजार खटल्यांपैकी दोन हजार खटले ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मार्गी लागले आहेत.

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विविध प्रकरणांत दाखल होणारे आणि प्रलंबित (जुने) असलेले अशा ३२ हजार खटल्यांपैकी दोन हजार खटले ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मार्गी लागले आहेत. या खटल्यांतील तक्रारदारांना तडजोड भरपाईपोटी एकूण २६ कोटी एक लाख ९७ हजारांची रक्कम मिळाली आहे. यामध्ये ठाणे तालुक्यातील निकाली लागलेल्या ६३१ तक्रारदारांना साडेसोळा कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले आहेत. तर, वसईत सर्वाधिक ९,३९९ खटले लोकअदालतीसमोर आले होते. यामध्ये दाखल होण्यापूर्वीचे आठ हजार २५६ तर जुने एक हजार १४३ खटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १२ तालुक्यांतील विविध १३ प्रकारांमधील खटले दाखल होण्यापूर्वीचे २० हजार ६००, तर जुने एक हजार ९३ असे ३१ हजार ८३५ खटले शनिवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीसमोर आले होते. त्यापैकी ८६८ खटले दाखल होण्यापूर्वीचे आणि एक हजार ९६१ खटले हे जुन्या खटल्यांपैकी निकाली निघाले. तसेच निकाली निघालेल्या ८६८ खटल्यांमध्ये दोन कोटी ३९ लाख आठ हजार ४९८.५२ इतकी, तर एक हजार ९३ खटल्यांमध्ये २३ कोटी ६२ लाख ८८ हजार १७५ इतकी भरपाईपोटी रक्कम दिली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकरणे ठाणे तालुक्यातील असून निकाली निघालेल्या खटल्यातील येथील तक्रारदारांनाच सर्वाधिक १६ कोटी ४९ लाख २४ हजार ७०० रुपयांची रक्कम तडजोडभरपाई मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन.आर.बोरकर यांच्या उपस्थितीत धनादेश दिले.>अपघातातील मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाईरस्ता अपघातात मृत्यू झालेले बीएसएनएलचे अभियंता दादाहरी मच्छिंद्र चंदनशिवे (४५) यांचे कुटुंब आणि इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीत सुरू असलेला दावा शनिवारी राष्टÑीय लोकअदालतीत निकाली काढण्यात आला. चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई देण्याचा निकाल दिला. त्यानंतर, इन्शुरन्स कंपनीने त्या रकमेचा धनादेश चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यावेळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन.आर. बोरकर, जिल्हा न्यायाधीश (१) डी.जी. मुरूमकर, मोटार अपघात दावा न्यायालयाचे सदस्य आर.एन. रोकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम.आर. देशपांडे, इफकोचे उपाध्यक्ष सनी भंडारी, मॅनेजर प्रदीप हे उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये शनिवारी विविध प्रकरणांतील सुमारे दोन हजार दावे १४ पॅनलद्वारे निकाली काढण्यात आले. ठाण्यातील कळवा-चिंचपाडा येथे राहणारे दादाहरी चंदनशिवे (४५) हे बीएसएनएलमध्ये उपविभागीय अभियंता होते. मृत्यूसमयी त्यांना दरमहा ८९ हजार २३१ रुपये वेतन मिळत होते. दादाहरी हे पत्नी आणि मुलीसोबत उस्मानाबाद येथून ठाण्यात गाडीने येत होते. त्यांची गाडी मुरबाडच्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-नगर रोडवर आली असता नो-एण्ट्रीमधून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर इन्शुरन्स कंपनीने भरपाईसाठी केलेल्या हिशेबात त्याच्या मासिक मिळकतीचा चौथा भाग देण्याचे निश्चित केले. मात्र, मासिक मिळकतीच्या हिशेबाने कुटुंबीयांनी एक कोटी ७५ लाखांच्या भरपाईचा दावा केला होता. लोकअदालतीत चंदनशिवे कुटुंबीयांच्या वतीने सुरेंद्र सोनावणे यांनी, तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अरविंद तिवारी यांनी युक्तिवाद केला. थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि न्यायालयीन प्रक्रि येमुळे समझोत्याला विलंब होतो. अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला सव्वा कोटी भरपाई : एमएसआरटीसीने (एसटी) सचिन घाणेकर या मरीन अभियंत्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी तब्बल सव्वा कोटी भरपाई देण्याबाबत समझोता केला. २८ डिसेंबर २०१४ रोजी पनवेलमधील टक्कानाका येथे जात असताना एसटी आणि ट्रकच्या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी घाणेकर यांच्या कुटुंबीयांनी मोटार वाहन विमा प्राधिकरणाकडे दोन कोटींच्या भरपाईचा दावा केला होता.>राष्टÑीय लोकअदालतीमधील निकाली तक्तातालुका एकूण खटले निकाली खटले भरपाईपोटीची रक्कमठाणे ५१७१ ६३१ १६४९२४७००नवी मुंबई ४७३० १२३ १८८५५,२४३भिवंडी १६६७ ११० १२२३९५१५उल्हासनगर २८८२ ७१ २०८३४५.५२पालघर ११८४ ६९ १४७८९७५६जव्हार १८४ १८ १७८८४०७वाडा १५३२ १५७ ५५६९९८४डहाणू ९३६ १८५ १८७५८३८शहापूर ३८८ २८ १३६३००वसई ९३९९ ३३० १४३०५१४३कल्याण ३३७८ २१७ २३९८१५९७मुरबाड ३८४ २२ ५२१८४५एकूण ३१,८३५ १९६१ २६,०१,९६,६७३.५२>मोटार अपघाताच्या १७४ प्रकरणांचा लागला निकालया लोकअदालतमध्ये मोटार अपघाताची ३२१ प्रकरणे न्यायालयासमोर आली होती. त्यापैकी १७४ प्रकरणांचा निकाल देण्यात आला. त्यात तडजोडीत १२ कोटी ६९ लाख ३० हजार ९३६ रुपयांची रक्कम नुकसानभरपाई मिळाली आहे.