शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

साडे चार कोटींच्या कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्याच्या १२६९ शेतकऱ्यांची नव्याने निवड

By सुरेश लोखंडे | Updated: October 4, 2018 17:04 IST

आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीठाणे जिल्ह्यातील ६८५ शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची निवड

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी ठाणे जिल्ह्यातील ६८५ तर पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची राज्य शासनाने नव्याने निवड केली. तशी यादी नुकतीच २८ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसीसी) सुपूर्दही केली. या यादीतील शेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीचे नियोजन केले आहे.आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांचे सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजारांचे कर्जमाफ होईल. यासाठी या यादीतील शेतकऱ्यांची तालुका पातळीवरील कमिटीकडून (टीएलसी) लवकरच तपासणी होऊन या एक हजार २६९ शेतकऱ्यांमधील पात्र शेतकऱ्यांना  तत्काळ कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. योग्य ते तपासणी होऊन संबंधीत शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.आतापर्यंत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची आता दहावी ग्रीनलिस्ट यांदी जाहीर करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांची तालुका स्तरावरील असिस्टन रजिस्टार, लेखा परीक्षक आणि टीडीसीसी बँकेचे वसुली अधिकारी यांच्या कमिटीव्दारे तपासणी होईल. त्यातून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. या नव्याने प्रसिध्द झालेल्या दहाव्या ग्रीनलिस्ट यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील ३९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांतील पात्र चा सुमारे एक कोटी सहा लाखांचे कर्ज माफ होईल. या खालोखाल शहापूर तालुक्यातील १५० शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी नव्याने निवड झाली. यातील पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५० लाख ९२ हजार रूपये कर्जमाफी देण्याचे नियोजन आहे.या ग्रीनलिस्ट यादीमध्ये भिवंडी तालुक्यातील देखील ८० शेतकऱ्यांची नावे आहेत. या निवड झालेल्या भिवंडीच्या शेतकऱ्यांना २७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्ज माफीची नियोजन आहे. याखालोखाल अंबरनाथ तालुक्यामधील ४० शेतकऱ्यांची निवड झाली. यामध्ये कुळगांवच्या ३७ शेतकऱ्यांसह नेवाळीच्या तीन शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांना सुमारे १३ लाख ९२ हजारांचे कर्म माफ होईल. कल्याण तालुक्यातील गोवेळी येथील चार शेतकऱ्यांनासह कल्याणच्या पाच आणि मांडा टिटवाळा येथील ११ शेतकऱ्यांची या दहाव्या ग्रीन यादीत निवड झाली. या २० शेतकºयांना १४ लाख ६८ हजारांचे कर्जमाफी मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी