शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

ठाण्यात मुलाचा खून करून कर्जबाजारी संगीत शिक्षकाने केली आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: May 31, 2018 21:28 IST

आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करुन स्वत:ही गळफास घेऊन शोमीक घोष या संगीत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी घडली. दुसरी पत्नी दिया हिच्या विरहातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या पत्नीचा विरह असहयदरवाजा तोडून काढावे लागले मृतदेहअनेकांचे लाखो रुपयांचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.घोष यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कारचालक प्रवीण चव्हाण (रा. पातलीपाडा, ठाणे) यांना काही कामानिमित्त एका वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चव्हाण वकिलाला घेऊन कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव्ह’ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तेव्हा घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाºयांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरकाव केला. त्यावेळी शोमीक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, मुलगा एकांक्ष हाही बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी घरात झडती घेतली, तेव्हा पत्नी सोडून गेल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, अशा आशयाच्या त्याने चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यातील एक पत्नी, दुसरी पोलिसांच्या नावाने, तर उर्वरित दोन घरमालकाच्या नावाने आहेत. चारही चिठ्ठ्यांमध्ये जवळपास सारखाच मजकूर आहे. कर्जबाजारी असला तरी त्याबाबतचा फारसा उल्लेख नाही. पण, पत्नीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.पहिल्या पत्नीकडून घटस्फोट...शोमीक घोष याचा पहिल्या पत्नीशी न पटल्यामुळे २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून त्याला सात वर्षांचा एकांक्ष हा मुलगाही आहे.शोमीकने २०१७ मध्ये दिया या तरुणीशी दुसरे लग्न केले. तिच्याकडून त्याने लग्नाआधीच ४० लाख आणि नंतर २० लाख असे ६० लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले होते. इमारतीमधील वाहने धुणाºया एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये, तर मुंबईतील सिंग या व्यक्तीकडूनही त्याने २५ लाख रुपये घेतले होते. अशा अनेक लोकांकडून त्याने एक ते दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. या प्रत्येकाला तो वेगवेगळी कारणे देऊन चकवा देत होता. त्याचे आईवडील कोलकाता येथे जिवंत असतानाही त्याने ते मृत पावल्याचे पत्नी दियाला सांगितले होते. परंतु, पत्नी या त्याच्या खोटारडेपणाला कंटाळली होती. घरीही कर्जवसुली करणाºयांच्या चकरा वाढल्या होत्या. या सर्वच प्रकाराला आणि त्याच्या खोटारडेपणाला कंटाळून दिया तीन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली होती.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या